पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्याचे माजी गृह राज्यमंत्री तथापुणे शहराचे प्रभारी मा. आ. सतेज (बंटी) पाटील साहेब यांनी गोकुळ दूध संघ संचालक मंडळ निवडणुकीत दणदणीत विजय खेचून आणल्याबद्दल अभिनंदन कार्यक्रम संपन्न.



 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्याचे माजी गृह राज्यमंत्री तथा

पुणे शहराचे प्रभारी मा. आ. सतेज (बंटी) पाटील साहेब यांनी गोकुळ दूध संघ संचालक मंडळ निवडणुकीत दणदणीत विजय खेचून आणल्याबद्दल अभिनंदन कार्यक्रम संपन्न.

 

     बलाढ्य सत्तेच्या झुंडीला पुरून उरणारे, गोकुळ दूध संघ संचालक मंडळ निवडणुकीत दणदणीत विजय खेचून आणणारे महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री तथा पुणे शहर जिल्हा काँग्रेस प्रभारी आ.श्री. सतेज (बंटी) पाटील साहेब यांचे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे स्वागत करून भव्‍य सत्कार करण्यात आला.

     यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी, पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप व पुणे मनपाचे गटनेते चंदूशेठ कदम यांनी आ. सतेज पाटील साहेब यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

     सहकार क्षेत्राचे आणि कोल्हापूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे शक्तिपीठ असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीत दूध उत्पादक सभासदांनी पुन्हा एकदा आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत आ. सतेज पाटील यांच्या 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने' २५ पैकी १३ जागा जिंकून गोकुळवर आपले निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे.

      सत्काराला उत्तर देताना आ. सतेज पाटील म्हणाले की, "हा विजय आमचा नसून गोकुळच्या लाखो स्वाभिमानी दूध उत्पादक सभासद शेतकऱ्यांचा आणि ठरावधारकांचा आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी समविचारी आघाडीला बहुमताने विजयी करून जो विश्वास आमच्यावर टाकला आहे, तो आम्ही नक्कीच सार्थ ठरवू. गोकुळ ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामधेनू असून, सर्व विजयी २५ संचालकांना सोबत घेऊन या संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि प्रगतीपथावर नेण्याचा आमचा मानस आहे"

     यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा