"डॉ श्रीनिवास सुरंगे यांनी जीवनभर संघमाध्यमातून समाज कार्य केले -मृत्यूनंतरही देहदान व नेत्रदान करून मोलाचे समाजकार्य केले."-- भाग्यश्री साठे
"डॉ श्रीनिवास सुरंगे यांनी जीवनभर संघमाध्यमातून समाज कार्य केले
-मृत्यूनंतरही देहदान व नेत्रदान करून मोलाचे समाजकार्य केले."
-- भाग्यश्री साठे
राष्ट्र सेविका समितीच्या
पूर्णवेळ प्रचारिका व केंद्रीय महिला समन्वय सहसंयोजिका
---राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी कर्वेनगर संघचालक डॉ श्रीनिवास सुरंगे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांतर्फे श्रद्धांजली.
पुणे
(प्रतिनिधी)
"डॉ श्रीनिवास सुरंगे ह्यांनी संघाच्या शिकवणीप्रमाणे व्यक्तिनिर्माणाचे कार्य तर केलेच त्याच बरोबर भावी पिढीला संघ कार्यात जोडून देण्यासाठी अविरत परिश्रम घेतले.अनेक कार्यकर्ते घडवले.अनेक संस्थांना मदत केली.दांडगा जनसंपर्क,सकारात्मक वागणूक,कृत्रिम मर्यादांमध्ये न अडकता सर्वांशी प्रेमळपणे वागून,संपर्क व सहवासातून अनेक कार्यकर्ते घडविण्याचे कार्य डॉ सुरंगे यांनी केले व नवीन पिढीसाठी एक आदर्श निर्माण केला.त्यामुळे अनेक स्वयंसेवकांच्या हृदयात त्यांच्या स्मृती कायम राहतील."असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितीच्या पूर्णवेळ प्रचारिका व केंद्रीय महिला समन्वय सहसंयोजिका भाग्यश्री साठे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वारा आयोजित डॉक्टर श्रीनिवास सुरंगे यांच्या श्रद्धांजली सभेमध्ये केले.
ह्यावेळी छत्रपती संभाजीभागाचे भागसंघचालक अनिल व्यास यांची व्यासपीठावर मुख्य उपस्थिती होती.कर्वेनगरचे सहकार्यवाह महेश कुलकर्णी यांनी वैयक्तिक पद्य सादर केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने कर्वेनगर येथील कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयामधील "के बी जोशी सभागृहा" त आयोजित श्रद्धांजली सभेत त्यांचे पुत्र डॉ रवींद्र म्हणाले,"माझे बाबा म्हणजे डॉ सुरंगे हे हाडाचे शिक्षक होते.आधुनिक वैद्यकशास्त्रावर त्यांचा विश्वास होता.माझे ज्ञान कोणासाठी कामाला यावे यासाठी त्यांनी जीवनभर ज्ञानदान केले मरणोत्तर देहदान व नेत्रदान ही करूनही समाजामध्ये व पुढील पिढीसाठी एक आदर्श निर्माण केला.बाबा नेहमी वर्तमान काळातजगायचे.विज्ञाननिष्ठ,
तर्कनिष्ठ,महिलांना सन्मान देणारे,समाजातील सर्व स्तरावरील व्यक्तींबरोबर माणुसकीने वागणारे,वाईट चालीरीतींना तिलांजली देणारे,उद्योगी,जिज्ञासू व प्रॅक्टिकल होते.त्यांना पब्लिक स्पीकिंग चे तंत्र ज्ञान अवगत होते.भारतभर वैद्यकीय महाविद्यालयात शिकवतांना अनेक डॉक्टर्स त्यांनी घडवले.पाँडिचेरी येथे असतांना त्यांनी गणेश हिंदू परिषदेची स्थापना केली होती.सार्वजनिक गणपती उत्सव करून समाजाला एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले.प्रतिकूल परिस्थितीत नोकरी सांभाळून,कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत जीवनामध्ये राष्ट्रभक्तीला प्राधान्य देत ते जगले व समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला."
यावेळी श्रीकांत करंजकर,मधुवंती जोगळेकर,सुहास दाबेकर,डॉ अभय हुपरीकर,शैलजा देशपांडे,प्रदीप फडके आदी मान्यवरांनी डॉक्टरांच्या जीवनशैलीविषयी व त्यांनी केलेल्या संघ कार्याविषयी माहिती देऊन आदरांजली वाहिली.
शांतीमंत्र होऊन श्रद्धांजली सभा संपली.
सभेस कर्वेनगर,कोथरूड सहित पुणे शहरातील तसेच राज्यातील अनेक स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment