हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली 'हिंदु राष्ट्र-स्थापने'ची प्रतिज्ञा !
दिनांक - 12.10.2026
कृपया प्रसिद्धीसाठी !
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण;
पुणे येथे घेतली 'हिंदु राष्ट्र-स्थापने'ची प्रतिज्ञा !
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित होऊन कार्यरत असलेल्या समितीच्या वतीने या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने देशभरात विशेष उपक्रम राबवण्यात येत आहेत. ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात 'हिंदवी स्वराज्या'ची प्रतिज्ञा घेतली होती, त्याच प्रेरणादायी धर्तीवर
पुणे येथे चतुःश्रृंगी मंदिर येथे आणि श्री तुकाई माता मंदिर, पारगाव (सा.मा.) येथे श्री तुकाई मातेच्या चरणी हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि समाजबांधवांनी संघटित होऊन 'हिंदु राष्ट्र-स्थापने'ची ऐतिहासिक प्रतिज्ञा घेतली.
या वेळी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करून भारत देशाला पुन्हा 'धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र' अर्थात् रामराज्य बनवण्यासाठी आयुष्य समर्पित करण्याचा दृढ निर्धार करण्यात आला. या प्रतिज्ञेद्वारे सनातन हिंदु धर्मावर अढळ श्रद्धा ठेवणे, हिंदु संस्कृतीचे संवर्धन करणे, तसेच देवळे, गोमाता आणि स्त्रियांचे प्राणपणाने रक्षण करण्याची शपथ घेण्यात आली. यासह आक्रमकांनी नष्ट केलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी आणि छत्रपती शिवरायांप्रमाणे 'शक्तीची उपासना' करून हिंदु राष्ट्रासाठी तन-मन-धनाचा त्याग करण्यासाठी सर्वांनी कटिबद्धता दर्शवली. "आता एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदु राष्ट्र ! जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।।" या निनादाने या वेळी हिंदु राष्ट्राचा जागर करण्यात आला.
समितीच्या या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुरू झालेल्या या राष्ट्रकार्यात आणि आगामी धर्मकार्यात सर्व धर्मप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment