भारत विकास परिषदेतर्फे दिव्यांगांना कृत्रिम पायाचे मोफत वाटप


-----
*भारत विकास परिषदेतर्फे दिव्यांगांना कृत्रिम पायाचे मोफत वाटप*

पुणे, दि. २२ - भारत विकास परिषदेच्या पुण्यातील दिव्यांग पुनर्वसन केंद्रामध्ये आज ७५ गरजू दिव्यांगांना कृत्रिम अत्याधुनिक पाय मोफत बसविण्यात आले. सुमारे ५० ते ७५ हजार रुपयांची किंमत असलेले पाय सिरम इन्स्टिट्यू्च्या विलू पुनावाला फौंडेशन यांच्या आर्थिक सहयोगातून आणि आर ए सस्टेनेबल एनर्जी सोल्यूशन यांच्या सहाय्याने या दिव्यांगांना मोफत बसवण्यात आले. आज झालेल्या या कार्यक्रमात काही दिव्यांगांनी विविध हालचाली करून प्रात्यक्षिके देखील करून दाखवली. कृत्रिम पाय बसवल्यावर दिव्यांगांनी जिना चढणे, मांडी घालून बसणे, उकिडवे बसणे, वीरासनात बसणे, धावणे वगैरे कृती करून दाखवल्या. पुनावाला ग्रुपतर्फे शेखर ढवळीकर, सुंदे कविटकर उपस्थित होते. भारत विकास परिषदेच्या ट्रस्टचे अध्यक्ष दत्ता चितळे, केंद्रप्रमुख विनय खटावकर, ट्रस्टी राजशेखर अभ्यंकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. गीता कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. परिषदेच्या या केंद्रातर्फे येत्या २३ ऑक्टोबर रोजी आळंदी, २९ ऑक्टोबर रोजी यवतमाळ आणि नोव्हेंबरमध्ये खामगाव येथे मोफत शिबिरे होणार आहेत, अशी माहिती यावेळी विनय खटावकर यांनी दिली.
----

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा