श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे २५ फूट प्रतीकात्मक रावण दहन*रामायणातील विविध कथांवर आधारित प्रसंगांचे सादरीकरण ; पुणेकरांची मोठी उपस्थिती


*श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे २५ फूट प्रतीकात्मक रावण दहन*
रामायणातील विविध कथांवर आधारित प्रसंगांचे सादरीकरण ; पुणेकरांची मोठी उपस्थिती

पुणे : महिला अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या, बालशोषण यांसह विविध सामाजिक समस्यांच्या प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरासमोर करण्यात आले. यावेळी प्रभू श्रीराम यांची वानरसेना आणि रावणाची सेना यांच्या युद्धाचा जीवंत प्रसंग व संपूर्ण रामायणाचा जीवंत देखावा सादर करण्यात आला. रावणाची भव्य हलती प्रतिकृती तसेच जिवंत देखाव्यातील हनुमान आणि जटायू हे यंदाचे प्रमुख आकर्षण ठरले.

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे मंदिरासमोर प्रतीकात्मक रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल २५ फूट उंच प्रतिकात्मक रावणाचे दहन यावेळी करण्यात आले. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, विश्वस्त व उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, राजेश सांकला, रमेश पटोदिया, राजकुमार चमडीया, निलेश लद्दड यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यंदाच्या उत्सवाचे आयोजन केले.

उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, नवरात्र उत्सवात स्त्री शक्तीचा जागर करण्यासोबतच नारी शक्तीचा सन्मान देखील करण्यात आला. यंदा आयोजित केलेल्या रावण दहन कार्यक्रमात देखील महिला अत्याचार व स्त्री भ्रूण हत्येसारख्या समस्यांच्या प्रतिकात्मक रावणाचे दहन करुन समाजात स्त्री सबलीकरणाचा संदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाजातील वाईट विचार, व्यसनाधीनता यांसारख्या अपप्रवृत्तीरुपी रावणाचे दहन करण्यात आले. विश्वकर्मा विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. तसेच यंदा प्रथमच आरोग्य शिबीरात भक्तांनी उस्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान शिबिरात देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा