धर्म आणि विज्ञानाचा समन्वय साधणारे संशोधक राष्ट्रपती म्हणजे डॉ. कलामज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ९५व्या जयंतीनिमित्त विजय चव्हाण यांच्या ‘डॉ. कलाम स्मृतीगंध’ आणि ‘कलाम यांच्या कविता : भावानुवाद’ या ग्रंथांचे प्रकाशन



धर्म आणि विज्ञानाचा समन्वय साधणारे संशोधक राष्ट्रपती म्हणजे डॉ. कलाम
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ९५व्या जयंतीनिमित्त विजय चव्हाण यांच्या ‘डॉ. कलाम स्मृतीगंध’ आणि ‘कलाम यांच्या कविता : भावानुवाद’ या ग्रंथांचे प्रकाशन

पुणे : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे धार्मिक कर्मकांड मानणारे नव्हते, मात्र धर्मवादी विचारांचे होते. धर्म आणि विज्ञान यांचा समन्वय साधणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. जगात पहिल्यांदाच देशाला संशोधक राष्ट्रपती लाभले. राष्ट्रपतीपदावर असतानाही त्यांनी विद्यार्थी, युवक, शेतकरी आणि सैनिकांशी थेट संवाद साधला. सूर्याप्रमाणे आपल्या कार्यासाठी सदैव तळपत राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. कलाम, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ९५व्या जयंतीनिमित्त विजय चव्हाण संपादित ‘डॉ. कलाम स्मृतीगंध’ आणि ‘कलाम यांच्या कविता : भावानुवाद’ या ग्रंथांचे प्रकाशन शुक्रवार पेठेतील जिजामाता हायस्कूल येथे करण्यात आले. यावेळी डीआरडीओ, पुणेचे उपसंचालक डॉ. के. आर. सिवन, नासा स्पेस एज्युकेटर लीना बोकील, अभियंता कमलकांत वडेलकर, लेखक विजय चव्हाण, हम्सा यलगुर, वीर शिवराय मंडळाचे किरण सोनिवाल, अनिकेत यादव, निलेश वरघन्टे, प्राचार्य संगीता खताळ, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील, शिक्षिका मनीषा चव्हाण, उज्ज्वला चव्हाण, शुभांगी पाटील सोनाली धोंडे, सुषमा तांबे, सतीश चव्हाण, अक्षय पानसरे, शिवाजी भंडारे, आतिश चव्हाण उपस्थित होते.

डॉ. के. आर. सिवन म्हणाले, डॉ. कलाम यांच्या सहवासात असताना कामाव्यतिरिक्त जेव्हा वेळ मिळत असे, तेव्हा ते जगाने पुढे कसे जावे आणि गरजू व्यक्तींना कशी मदत करता येईल, याचाच विचार करत असत. विश्वकल्याणाचा विचार करणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे विचार आजही संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहेत.

विद्यार्थ्यांनी नेहमी कष्ट केले पाहिजेत आणि आपल्या कष्टांवर विश्वास ठेवला पाहिजे. स्वतःची तुलना इतरांशी करण्याऐवजी स्वतःच्या क्षमता ओळखल्या पाहिजेत. एखादे क्षेत्र निवडल्यानंतर केवळ त्यापुरते मर्यादित न राहता स्वतःच्या क्षमता आणि आवडींचा अधिकाधिक शोध घेत, स्वतःच्या क्षमता आणि कौशल्यांचा अधिकाधिक विकास केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

विजय चव्हाण म्हणाले, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या विचारांतून आणि कार्यातून देशातील असंख्य युवकांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या साधेपणातून, ज्ञानातून आणि राष्ट्रनिर्माणाच्या ध्यासातून आजच्या पिढीने प्रेरणा घेतली पाहिजे. युवकांनी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून देशाच्या विकासात योगदान द्यावे, हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. युवकांना डॉ. कलाम यांच्या विचारांतून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने मी त्यांच्या विचारांचा संदेश पुस्तकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहे. लीना बोकील यांनी देखील मार्गदर्शन केले.

अनिकेत यादव यांनी सूत्रसंचालन केले.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा