पुरस्कारार्थींना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

*लोकमान्यनगरात ‘नवदुर्गा’ आणि ‘योद्धा पुरस्कार’ सोहळा उत्साहात संपन्न; महिला आणि पुरुषांच्या कार्याचा गौरव* 

 *सामाजिक योगदानाची दखल; १३ महिलांसह पुरुषांना ‘नवदुर्गा’ आणि ‘योद्धा पुरस्कार’ प्रदान* 

पुणे : सामाजिक बांधिलकी जपत समाजहितासाठी योगदान देणाऱ्या महिला आणि पुरुषांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित ‘नवदुर्गा पुरस्कार २०२६’ आणि ‘योद्धा पुरस्कार २०२६’ सोहळा लोकमान्यनगर येथील जॉगिंग पार्कमध्ये उत्साहात पार पडला. या वेळी पुरस्कारार्थींना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

महिलांच्या कर्तृत्वाचा, जिद्दीचा आणि सामाजिक योगदानाचा सन्मान करण्यासाठी ‘नवदुर्गा पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने सुमन पोतदार, सुप्रिया झेंडे, सुनीता गुजराती, माधवी गांधी, ज्योती जगताप, मैथिली आफळे, सुनीता झाडभुखे, नीता ससाने, निलिमा तेलेग, आशाश्री निफाडकर, शारदा मोहोळ, अर्चना करपे आणि डॉ. सुप्रिया लेखेडे यांना सन्मानित करण्यात आले.

तसेच समाजासाठी संघर्ष करणाऱ्या आणि सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या पुरुषांचा गौरव ‘योद्धा पुरस्कार २०२६’ देऊन करण्यात आला. या पुरस्काराने बिपीन देशमुख, रामचंद्र कुलकर्णी, संतोष बोर्डे, हेमंत पाटील, मुकेश वैराट, सुनील कुसुरकर, उत्पल व्ही. बी., अन्वय भोसले, सुशांत क्षीरसागर, संदीप चांदोरकर, शैलेश चौधरी, शैलेश आडके, महेंद्र लेले आणि गणेश दाबक आदींचा सन्मान करण्यात आला.

लोकमान्यनगरच्या पुनर्विकासाच्या प्रश्नावर स्थगितीच्या विरोधात उभारलेल्या आंदोलनात पुणे लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या माध्यमातून अनेकांनी सक्रिय सहभाग घेतला. सामाजिक एकजूट, संघर्ष आणि लोकहितासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत या पुरस्कारांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात 

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा