महाराष्ट्रात प्रथमच प्रा.डॉ. कृष्णा पाटील 'राष्ट्रीय युवा बालदंत चिकित्सा संशोधक २०२५' पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्रात प्रथमच प्रा.डॉ. कृष्णा पाटील 'राष्ट्रीय युवा बालदंत चिकित्सा संशोधक २०२५' पुरस्काराने सन्मानित
पुणे दि. ०५ : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय दंत महाविद्यालय व रुग्णालय धनकवडी येथील प्रा.डॉ. कृष्णा पाटील यांना इंडियन सोसायटी ऑफ पेडोडॉन्टिक्स अँड प्रिव्हेंटिव्ह डेंटिस्ट्री, दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा 'राष्ट्रीय यंग पेडोडॉन्टिक्स रिसर्च अवॉर्ड 2025-26 ' या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथमच हा पुरस्कार मिळवणारे डॉ. कृष्णा पाटील हे राज्यातील पहिले डॉक्टर ठरले आहेत. या पुरस्कारामागे आई-वडील व पत्नी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर, विभागप्रमुख डॉ. प्रीतम शहा, सहकारी प्राध्यापक यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, प्र- कुलगुरू डॉ.विश्वजीत कदम यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Comments
Post a Comment