चित्रपट निर्मितीत स्वत:चा अनुभव मांडा : संतोष डावखरमुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘गोंधळ’ चित्रपटातील कलाकारांशी संवाद


चित्रपट निर्मितीत स्वत:चा अनुभव मांडा : संतोष डावखर

मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘गोंधळ’ चित्रपटातील कलाकारांशी संवाद

पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी चित्रपट निर्मितीची प्रक्रिया काय असते हे जाणून घेऊन ‘गोंधळ’ चित्रपटाची निर्मिती केली. तुम्ही जितके गुंतागुतींचे चित्रपट बनवायला जाता तितके ते तुमच्या कथानकाला हानीकारक ठरतात. चित्रपटाच्या माध्यमातून विषय मांडताना तुमचा स्वत:चा अनुभव मांडणे अधिक प्रभावी ठरते. या गोष्टीचा साकल्याने विचार करून मराठी मातीतल्या ‘गोंधळ’ या विषयाची निवड केली आणि हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला, असे मत चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर यांनी व्यक्त केले.

मुंबा फिल्म फाउंडेशन आयोजित सातव्या मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शुक्रवारी (दि. ९) ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकनप्राप्त ‘गोंधळ’ या चित्रपटातील कलावंत, तंत्रज्ञ यांच्याशी संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम, इशिता देशमुख, राम बेंद्रिकर, ऐश्वर्या शिंदे, कैलास वाघमारे मंचावर होते. त्यांच्याशी महिमा ठोंबरे यांनी संवाद साधला.

संतोष डावखर पुढे म्हणाले, ‘ऑस्कर’साठीच चित्रपटाची निर्मिती करायची या उद्देशाने अनेक गोष्टी वाचल्या, अभ्यासल्या आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटही पाहिले. त्यातून मला जे आकलन झाले त्यानुसार हा चित्रपट तयार केला. ते पुढे म्हणाले, चित्रपटाची मांडणी अतिशय सोप्या पद्धतीची असणे आवश्यक असते. समाजाला काय आवडेल याचा विचार केला तर तुम्ही ना धड इकडचे ना तिकडचे.

आवडलेली भूमिका मिळावी यासाठी आग्रह असतो असे सांगून किशोर कदम म्हणाले, चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही जितके लोकल व्हाल तितके तुम्ही ग्लोबल बनता यावर विश्वास आहे. ‘गोंधळ’ चित्रपट यशस्वी होण्यासाठी आपल्या मातीतील, भाषेतील, लोकसंस्कृतीतील चित्रपट हा कळीचा मुद्दा ठरला आहे. आज मराठीच्या बाबतीत चोखंदळपणे विचार करणारे निर्माते चित्रपट बनवू लागल्याने वैश्र्विक पातळीवर स्वत्व जपत त्यांची वेगळी ओळख निर्माण होते आहे.

इशिता देशमुख, राम बेंद्रिकर, ऐश्वर्या शिंदे, कैलास वाघमारे यांनी चित्रपट निर्मितीच्या प्रवासातील अनुभव कथन केले.

 

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा