एसआरए कार्यालयातील बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी रिपब्लिकन संघर्ष दलाच्यावतीने आंदोलन




एसआरए कार्यालयातील बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी 
रिपब्लिकन संघर्ष दलाच्यावतीने आंदोलन


 युनिर्व्हसिटी रोड येथील मुख्य कार्यकारी अधिकारी पुनर्वसन प्राधिकरण पुणे पिंपरी चिंचवड कार्यालयावर रिपब्लिकन संघर्ष दलाचे नेते संजयजी भिमाले यांचे नेतृत्वात जवाब दो बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी पुर्नवसन प्राधिकरण पुणे, पिंपरी चिंचवड क्षेत्र पुणे कार्यालय येथे गोरगरीब कष्टकरी अनूसूचित जातीतील व वंचित झोपडीधारक, फायनल प्लॉट न ८९८ व छत्रपती शिवाजी स्टेडियम मंगळवार पेठ, जुना बाजार पुणे यांच्या झोपडीचा सर्व्हे ४ वर्षापुर्वी झालेला असतानाही अद्याप या योजनेची अंमलबजावणी होत नसून वंचित झोपडीधारकांच्या योजनेत विलंब होत असून या बेजबाबदार भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ एसआरए कार्यालयातील बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी बुधवार दिनांक १४/१०/२०२६ रोजी युनिव्र्व्हसिटी रोड येथील मुख्य कार्यकारी अधिकारी पुनर्वसन प्राधिकरण पुणे पिंपरी चिंचवड कार्यालयावर जवाब दो बोंबाबोंब आंदोलन संघटनेचे नेते संजयजी भिमाले यांच्या नेतृत्वात करण्यात आले. मागण्यांचे निवेदन पुर्नवसन प्राधिकरणचे सचिव, मा. शितल निकम मॅडम यांना देण्यात आले.

यावेळी. पुणे शहर अध्यक्ष नितीन बालकी, पुणे शहर संघटक विशाल अंदे, इरफान सैय्यद, घनशाम फुलपगार, अजय शिंदे, संजय गायकवाड, अॅड. राकेश टोटे पाटील, खालीद शेख, दिनेश सदगुरे, साई श्रीवास्तव, रमेश शिंदे, जाहिदा शेख, कलावती तुपसौंदर, प्रिती जोशी, शाहिस्ता शेख, मंगलताई जाधव, अन्नू कांबळे, रिपब्लिकन पॅथर इंडियाचे अध्यक्ष गौतम डोळस, महार बटालीयन सेनेचे अध्यक्ष गोरख घोडके, जनकल्याणी पार्टीचे अध्यक्ष रामभाऊ वाघमारे इ. प्रमुख व झोपडीधारक मोठ्या संख्येने उपस्थित 

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा