इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग’च्या तिसऱ्या हंगामासाठी २१ देशांतील १४६ रायडर्सची नोंदणी


‘इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग’च्या तिसऱ्या हंगामासाठी २१ देशांतील १४६ रायडर्सची नोंदणी

नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘२५० सीसी – ग्रुप ‘ए’ फॉरेन बाइक्स ओन्ली – इंडियन फ्युचर्स’ गटामुळे भारतीय रायडर्सना आपली क्षमता दाखवण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे देशांतर्गत प्रतिभेला अधिक संधी.
एएमए, एफआयएम आणि इतर आघाडीच्या स्पर्धांतील विजेत्या रायडर्सचा मोठ्या प्रमाणावर सहभाग, तसेच सरकारकडून मिळणारे अतिरिक्त पाठबळ, यांमुळे भारताची जागतिक सुपरक्रॉस क्षेत्रातील एक महत्त्वाचे केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू.
पुणे, 8 ऑक्टोबर २०२६ : जगातील पहिली फ्रँचायझी-आधारित सुपरक्रॉस स्पर्धा असलेल्या ‘इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग’ने (आयएसआरएल) आपल्या तिसऱ्या हंगामासाठी खेळाडूंच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या हंगामात २१ देशांतील १४६ खेळाडूंची लीगच्या चार रेसिंग गटांमध्ये नोंदणी झाली. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित स्पर्धकांसह भारतातील आघाडीचे ‘सुपरक्रॉस रायडर्स’ही सहभागी होणार आहेत. त्यामुळे स्पर्धेची गुणवत्ता अधिक उंचावण्यास मदत होणार असून, भारतातील सुपरक्रॉस क्रीडेच्या विकासालाही चालना मिळणार आहे. यंदा नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘२५० सीसी – ग्रुप ‘ए’ फॉरेन बाइक्स ओन्ली – इंडियन फ्युचर्स’ गटासह ‘२५० सीसी इंडिया-एशिया मिक्स’ गटामध्ये भारतातून ३० नोंदणी झाल्या आहेत.

फ्रान्समधून सर्वाधिक ३२ खेळाडूंनी नोंदणी केली असून, त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियातून २० आणि अमेरिकेतून १८ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. याशिवाय इंडोनेशिया, थायलंड, जर्मनी, स्पेन, स्वित्झर्लंड, इटली, जपान, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, झेक प्रजासत्ताक, स्वीडन, झिम्बाब्वे, श्रीलंका आणि मंगोलिया येथील खेळाडूही स्पर्धेत सहभागी होणार आहेत. नोंदणी झालेल्या खेळाडूंमध्ये ‘४५० सीसी इंटरनॅशनल’ गटात ४०, ‘२५० सीसी इंटरनॅशनल’ गटात ५४ आणि ‘२५० सीसी इंडिया-एशिया मिक्स’ गटात २६ खेळाडूंचा समावेश आहे. या नोंदणींमुळे यंदाची स्पर्धा अधिक वैविध्यपूर्ण आणि चुरशीची होणार असल्याचे दिसून येते.

तिसऱ्या हंगामातील खेळाडूंच्या यादीत या क्रीडा प्रकारातील अनेक नामांकित रायडर्सचा समावेश आहे. ‘४५० सीसी इंटरनॅशनल’ गटात दुसऱ्या हंगामाचा विजेता मॅट मॉस याच्यासह जॉर्डी टिक्सिएर, जॉन शॉर्ट, अँथनी बॉर्डन, ग्रेगरी अरांडा, रायन ब्रीस, ल्यूक क्लाउट आणि अँथनी रॉड्रिग्झ यांचा समावेश आहे; तर ‘२५० सीसी इंटरनॅशनल’ गटात रीड टेलर, कॅल्विन फोनव्हिएल, जस्टिन रोडबेल आणि निको कोच हे रायडर्स सहभागी होणार आहेत. ‘२५० सीसी इंडिया-एशिया मिक्स’ गटात वित्सारुत सलंगाम, थानारत पेनजान, अथिसोन रुआद्रेओ, नकामी विदी मकारिम, बेन हॉलग्रेन आणि मुहम्मद अथार अलघिफारी यांसारखे खेळाडू सहभागी होत असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेला आणखी रंगत येणार आहे.

भारताचे प्रतिनिधित्व देशातील काही आघाडीचे सुपरक्रॉस रायडर्स करणार आहेत. त्यामध्ये ऋग्वेद बारगुजे, प्रज्वल विश्वनाथ, श्लोक घोरपडे आणि इक्षण शानभाग यांचा समावेश आहे. जगभरातील विविध देशांतील नामांकित रायडर्ससोबत हे भारतीय खेळाडूही स्पर्धेत उतरणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना चुरशीच्या शर्यती पाहायला मिळणार आहेत. तसेच भारतीय खेळाडूंना आपल्या देशातच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रायडर्सविरुद्ध स्पर्धा करण्याची आणखी एक महत्त्वाची संधी मिळणार आहे.

रायडर्सची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग’चे सह-संस्थापक आणि संचालक ईशान लोखंडे म्हणाले, “यंदाच्या नोंदणीचे महत्त्व केवळ सहभागी झालेल्या रायडर्सच्या किंवा देशांच्या संख्येपुरते मर्यादित नाही. सुपरक्रॉसमध्ये आघाडीवर असलेल्या देशांतील नामांकित रायडर्स सातत्याने भारतात स्पर्धा करण्यासाठी येत आहेत. यावरून आपल्या स्पर्धेच्या दर्जाबाबत आणि या क्रीडा क्षेत्राच्या वाढीबाबत त्यांचा विश्वास वाढत असल्याचे दिसून येते. तसेच इंडियन फ्युचर्स हा गट भारतीय रायडर्ससाठी नियोजनबद्ध प्रगतीचा मार्ग तयार करण्याच्या आमच्या उद्दिष्टाचा महत्त्वाचा भाग आहे. या गटालाही उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा