कौस्तुभ गावडे कोण आहेत?**पुणे शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातून भाजपकडून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी*



पुणे - सध्या ते कोल्हापूर येथील 'श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था' येथे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे ते नातू आहेत.

पुणे विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघातून भाजपकडून स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारे आणि शिक्षण क्षेत्राशी थेट नाळ जोडलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. 

कौस्तुभ गावडे हे उच्चविद्याविभूषित असून त्यांनी 'एम.कॉम' (M.Com) आणि 'एमबीए' (MBA) शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते कोल्हापूर येथील 'श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था' येथे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे ते नातू असून, आजोबांच्या शैक्षणिक विचारांचा आणि कार्याचा वारसा त्यांना मिळाला आहे. तसेच प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या मार्गदर्शनातून आणि शैक्षणिक संस्कारातून त्यांची विचारसरणी आकाराला आली आहे.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना कौस्तुभ गावडे यांनी शिक्षक, प्राध्यापक, संस्थाचालक आणि शैक्षणिक प्रशासन यांच्याशी जवळून संवाद साधला आहे. या कार्यकाळात त्यांनी शिक्षकांच्या दैनंदिन अडचणी, शिक्षण संस्थांसमोरील प्रशासकीय व शैक्षणिक आव्हाने यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. त्यांच्या मते, शिक्षकांचे प्रश्न हे केवळ निवडणुकीचे मुद्दे नसून त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाचा विषय आहेत. पुणे विभागातील शिक्षक संघटना आणि प्रतिनिधींशी सातत्यपूर्ण संवाद साधून शिक्षकांच्या हितासाठी एकत्र येण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.   

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ साठी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने (टीडीएफ) ने देखील कौस्तुभ गावडे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा केली. महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी ही १९६५ मध्ये स्वर्गीय आमदार तात्यासाहेब सुळे यांनी स्थापन केलेली राज्यातील जुनी शिक्षक संघटना आहे. आतापर्यंत टीडीएफच्या माध्यमातून २० ते २२ आमदारांनी महाराष्ट्र विधानपरिषदेत शिक्षकांचे प्रतिनिधित्व केले आहे. शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेने आंदोलने आणि संपाच्या माध्यमातून सातत्याने लढा दिला आहे.
“पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात यापूर्वी टीडीएफ आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली आहे. या माध्यमातून सलग तीन टर्म टीडीएफचे आमदार या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. यामध्ये दोन वेळा सुरेश पाटील, तर एकदा ऐनापुरे यांनी आमदार म्हणून काम केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात टीडीएफची मजबूत संघटनात्मक पार्श्वभूमी आहे.”

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानातून ४० हजारांहून अधिक शिक्षक मतदारांची विक्रमी नोंदणी झाल्याचा दावा गावडे यांनी केला. टीडीएफने पुरस्कृत उमेदवारी दिल्यामुळे महायुतीकडून उमेदवारी मिळविण्यासाठीही आपली भूमिका अधिक बळकट झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

टीडीएफच्या पाठिंब्यामुळे निवडणुकीत संघटनात्मक बळ मिळाले असून, शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे कौस्तुभ गावडे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा