संधिवात ही केवळ वृद्धापकाळातील समस्या नाही; वेळीच निदान महत्त्वाचे


संधिवात ही केवळ वृद्धापकाळातील समस्या नाही; वेळीच निदान महत्त्वाचे


पुणे, ११ ऑक्टोबर २०२६ : संधिवात हा प्रामुख्याने वृद्धापकाळात होणारा आजार असल्याचा समज असला, तरी आता तरुणांमध्येही संधिवात आणि सांधेदुखीच्या समस्या दिसून येत आहेत असे मत तज्ज्ञांनी जागतिक संधिवात दिनानिमित्त (१२ ऑक्टोबर) व्यक्त केले.  

नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर, पुणे येथील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विशाल चौधरी म्हणाले, “बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा आणि दैनंदिन सवयींमधील त्रुटींमुळे सांध्यांच्या समस्या वाढू शकतात. सकाळी उठल्यावर सांधे आखडणे, जिने चढताना वेदना होणे, वारंवार सांधेदुखी आणि सांध्यांना सूज येणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत.”

तरुणांनाही होणाऱ्या दाहजन्य संधिवातामध्ये सकाळी सांधे आखडणे आणि सूज येणे अशी लक्षणे दिसतात. हालचाल केल्याने त्यात काही प्रमाणात आराम मिळू शकतो. याउलट, वयानुसार सांध्यांची झीज झाल्यामुळे होणाऱ्या संधिवातात हालचालींमुळे वेदना वाढू शकतात. दाहजन्य संधिवातावर वेळेत उपचार न केल्यास सांध्यांचे नुकसान होऊ शकते.

केवळ वेदनाशामक औषधे किंवा घरगुती उपायांवर अवलंबून राहणे टाळावे, कारण त्यामुळे मूळ आजारावर उपचार होत नाहीत. वजन नियंत्रणात ठेवणे, नियमित स्ट्रेचिंग आणि स्नायू बळकट करणारे व्यायाम सांध्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. योग्य रुग्णांसाठी बायोलॉजिकल थेरपीसारख्या आधुनिक उपचारपद्धतींमुळेही दाहजन्य संधिवाताचे नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता येते.

“सांधेदुखी दीर्घकाळ टिकत असेल, सांध्यांना लालसरपणा किंवा सूज येत असेल अथवा आखडलेपणा वाढत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळीच निदान आणि योग्य उपचारांमुळे सांध्यांचे पुढील नुकसान टाळण्यास तसेच हालचाल आणि जीवनमान चांगले राखण्यास मदत होते,” असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा