दगडूशेठ' गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र**श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे आयोजन*
*'दगडूशेठ' गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र*
*श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे आयोजन*
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानातंर्गत महाराष्ट्राच्या विविध भागातील ५०० ज्येष्ठ नागरिकांना मोफत श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. सदाशिव पेठेतील फडके हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष सुनील रासने, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, विश्वस्त राजेंद्र गावडे, विश्वस्त पराग वांबुरे, राजाभाऊ घोडके, विलास रासकर, राजेंद्र पायमोडे, सुवर्णयुग तरुण मंडळ अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, सनी सिद्ध, ऋणाल केसरकर ,विशाल केदारी, तुषार रायकर, दिनेश परदेशी, महादेव पवार, इंद्रजीत रायकर, संतोष रसाळ यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अॅलिम्को कंपनीच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टचे वैद्यकीय सेवा प्रमुख राजेंद्र परदेशी आणि सहकाऱ्यांनी उपक्रमाचे व्यवस्थापन केले.
ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, 'रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा' हे ब्रीद अंगीकारून ट्रस्ट कार्यरत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील गरजू रुग्णांसाठी विविध सेवा दिल्या जात आहे. त्यापैकी ज्येष्ठ नागरिकांना मोफत श्रवणयंत्र वाटप हा उपक्रम राबविला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांची पूर्व नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या कानाचे माप घेऊन त्यानुसार यंत्र दिले जाते. त्यामुळे भविष्यात रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यासारख्या भागातून तसेच बीड, जालना, परभणी, नांदेड, यवतमाळ अशा विविध जिल्ह्य़ातील लाभार्थीचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत ३२ हजार नागरिकांना मोफत श्रवण यंत्राचे वाटप करण्यात आले.
Comments
Post a Comment