पहिल्या सहामाहीत भारतातील ६१ शहरांमध्ये शालेय बस सुरक्षेशी संबंधित ७५,००० हून अधिक घटनांची नोंद, इनटँगल्सच्या संशोधनामधून माहिती उघड
पहिल्या सहामाहीत भारतातील ६१ शहरांमध्ये शालेय बस सुरक्षेशी संबंधित ७५,००० हून अधिक घटनांची नोंद, इनटँगल्सच्या संशोधनामधून माहिती उघड
दिल्ली हा चिंतेचा मुख्य विषय ठरला आहे, जिथे दर ५ पैकी ४ शालेय बसेसमध्ये वेगमर्यादा ओलांडल्याच्या घटनांची नोंद झाली आहे, तर महाराष्ट्रात अचानक वेग वाढवण्याच्या घटनांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत सहा पटीने जास्त नोंदवले गेले आहे.
११६ शालेय बसेसमध्ये दर २ ते ३ दिवसांनी वेगमर्यादा ओलांडल्याच्या घटनांची नोंद झाली, ज्यामध्ये विहित केलेल्या ताशी ४० किलोमीटरच्या मर्यादेच्या तुलनेत वाहनांचा सरासरी वेग ताशी ७९ किलोमीटर इतका आढळला.
पुणे, १६ ऑक्टोबर २०२६: इनटँगल्स या कमर्शियल फ्लीट्स आणि मोबिलिटी अॅनालिटिक्स क्षेत्रातील आघाडीच्या जागतिक एआय-सक्षम प्रिस्क्रिप्टिव्ह अॅनालिटिक्स कंपनीने भारतातील शालेय बसेसच्या सुरक्षिततेवर संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे. या संशोधनानुसार, देशातील ६१ शहरांमध्ये तपासण्यात आलेल्या दर पाच शालेय बसेसपैकी एका बसमध्ये वेगमर्यादा ओलांडल्याची (ओव्हर-स्पीडिंग) किमान एक घटना नोंदवली गेली आहे. भारतातील ५९८ शालेय बसेसमधील वाहन चालवण्याच्या पद्धतीचा अभ्यास करताना प्रादेशिक पातळीवर मोठी तफावत समोर आली आहे. राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण दर पाच पैकी एक बस असताना दिल्लीत तपासलेल्या दर पाचपैकी चार शालेय बसेसमध्ये वेगमर्यादा ओलांडल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रही या चिंतेच्या केंद्रस्थानी आला असून राज्यात राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत अचानक वेग वाढवण्याच्या घटनांचे प्रमाण सहा पटीने जास्त नोंदवले गेले आहे.
हे निष्कर्ष इनटँगल्सच्या ‘इंटरेस्टिंग अँगल्स - भाग २: बियाँड द रूलबुक’ या नवीन संशोधनाचा भाग आहेत. या संशोधनामध्ये २०२६ मधील सहा महिन्यांच्या कालावधीत ५९८ शालेय बसेसमधील सुरक्षिततेशी संबंधित ७५,००० हून अधिक नोंदींचे विश्लेषण करण्यात आले. शालेय बसेसच्या पारंपरिक सुरक्षा तपासणीत सहसा न दिसणाऱ्या जोखमींचे मूल्यांकन करण्यासाठी यामध्ये अतिवेग (ओव्हर-स्पीडिंग), अचानक ब्रेक लावणे (हार्ड ब्रेकिंग), अचानक वेग वाढवणे (हार्ष अॅक्सिलरेशन) आणि कोस्टिंग (गिअर न्यूट्रल करून वाहन चालवणे) या चार प्रकारच्या ड्रायव्हिंग सवयींचे परीक्षण करण्यात आले. या संशोधनामध्ये ११६ शालेय बसेसचीही ओळख पटवण्यात आली आहे, ज्यांच्यामध्ये दर दोन ते तीन दिवसांनी अतिवेगाच्या घटनांची नोंद झाली. अशा घटनांदरम्यान बसेसचा सरासरी वेग ताशी जवळपास ७९ किलोमीटर नोंदवला गेला, जो विहित मर्यादेपेक्षा कितीतरी पट अधिक आहे. हे निष्कर्ष स्पष्ट करतात की, अनिवार्य स्पीड गव्हर्नर्स आणि प्रमाणित जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम्सपलीकडे जाऊन चालकांच्या ड्रायव्हिंग सवयींवर सातत्याने लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
या विश्लेषणात शालेय बसेस आणि सामान्य शहर बसेसमधील ड्रायव्हिंगच्या इशाऱ्यांची (अलर्ट्स) तुलना देखील करण्यात आली आहे, तसेच वाहन चालवण्याच्या पद्धतीमध्ये आणि त्याच्याशी संबंधित सुरक्षेच्या
Comments
Post a Comment