हिंदू समाजात एकजूट निर्माण झाली पाहिजेसमस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांचे मतसमस्त हिंदू आघाडीतर्फे राष्ट्रीय एकात्मता दिन
हिंदू समाजात एकजूट निर्माण झाली पाहिजे
समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांचे मत
समस्त हिंदू आघाडीतर्फे राष्ट्रीय एकात्मता दिन
पुणे : आजची परिस्थिती बदलायची असेल, तर हिंदू समाजात एकजूट निर्माण झाली पाहिजे. हिंदू धर्म ज्ञान आणि अध्यात्माच्या दृष्टीने सामर्थ्यशाली आहे. मात्र, अनेक ठिकाणी लव्ह जिहादच्या घटना घडत असून धर्मांतराच्या माध्यमातून धर्मावर आक्रमण होत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे लोकांनी सर्व हिंदू समभावाचे आचरण करावे, असे मत समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त समस्त हिंदू आघाडी पुणे शहराच्या वतीने सोमवार पेठेतील श्री गाडगेबाबा धर्मशाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे यंदा १९ वे वर्ष होते. राष्ट्रसंत पूजनीय गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना यावेळी अभिवादन करण्यात आले. यावेळी हिंदू धर्म जागरणाचे काम करणाऱ्या युवक आणि महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्राध्यापक अनिल भोसले, विकी ढोले उपस्थित होते.
मिलिंद एकबोटे म्हणाले, भारतात भेदभाव निर्मूलनासाठी ठोस प्रयत्न झाले पाहिजेत. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याची मुहूर्तमेढ आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक आणि लहुजी वस्ताद साळवे यांनी रोवली. ज्या समाजाच्या उन्नतीचे स्वप्न आपण पाहतो, तो समाज सुप्त सामर्थ्याने संपन्न आहे.
प्राध्यापक अनिल भोसले, सामाजिक कार्यकर्ते शिवम सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. विकी ढोले यांनी सूत्रसंचालन केले.
-
Comments
Post a Comment