पुण्यात ५०० पेक्षा अधिक मंडळानी विसर्जन मिरवणुकीत ध्वनी मर्यादा ओलांडली : लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाचा दावा

*पुण्यात ५०० पेक्षा अधिक मंडळानी विसर्जन मिरवणुकीत ध्वनी मर्यादा ओलांडली : लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाचा दावा* 

गणेश उत्सव आणि विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेगवेगळ्या ठिकाणी आवाजाच्या पातळीच्या नोंदी घेतल्या. ध्वनी प्रदूषण कायद्याप्रमाणे शहरांमध्ये व्यावसायिक भागात 65 डेसिबलची मर्यादा आहे. तब्बल 200 मंडळांपाशी या नोंदी घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने टेंडर ही काढले.
मात्र अडीच कोटी खर्च करूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा गणेश उत्सव दरम्यानचा सविस्तर अहवाल अजून उपलब्ध नाही. *न्यायालयाच्या आदेशानुसार एक आठवड्याच्या आत हा अहवाल वेबसाईटवर प्रकाशित करणे आवश्यक होते.*

यावेळेस गणेश उत्सवा दरम्यान कर्णकर्कश्य आवाजाला विरोध करत अनेक पुणेकर रस्त्यावर उतरले ,आता दोन आठवडे झाल्यावरही अजूनही या संदर्भात पोलिसांनी केसेस दाखल केलेल्या नाहीत. दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांनी सुद्धा आपला सविस्तर अहवाल जाहीर केलेला नाही. कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ने मात्र लगेचच आपला अहवाल प्रकाशित केला. हरित लवादा ने आणि मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिल्यावरही अजूनही कारवाई झालेली नाही. 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे महाबळ एन्व्हायरमेंटल इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस पुण्यात 200 मंडळे व 15 चौकांमध्ये आवाजाची नोंदणी करण्याचे काम देण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार यातील सर्वच 200 ठिकाणी ध्वनी प्रदूषण मर्यादेचा भंग झालेला आहे त्यामुळे या सर्वच 200 मंडळांवर गुन्हे दाखल होणे आवश्यक होते. दुसरीकडे पोलिसांनी सुद्धा या संदर्भात आवाजाची नोंदणी केलेली असून त्याची माहिती उपलब्ध झालेली नाही. 500 पेक्षा अधिक मंडळांच्या मिरवणुकीमध्ये ध्वनी मर्यादेचे उल्लंघन झाल्याची माहिती आहे. कॉलेज ऑफ इंजीनियरिंग च्या रिपोर्टनुसार सर्वच ठिकाणी सरासरी 104.5 डेसिबल च्या जवळपास आवाज पातळी होती.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 22 सप्टेंबर 2026 च्या अहवालानुसार 90 डेसिबल पेक्षा अधिक आवाजाची नोंद झालेली मंडळे पुढील प्रमाणे आहेत. अखिल तानाजी नगर मित्र मंडळ धनकवडी, नाना हौद तरुण मंडळ, श्रीनाथ गणेश मंडळ ,साई सिद्धी मित्र मंडळ, अखिल इंदिरानगर मित्र मंडळ बिबेवाडी, मराठा मित्र मंडळ, मुंजोबाचा बोळ तरुण मंडळ, शिवाजी संघ मंडळ शनिवार वाडा, विश्वजीत मित्र मंडळ नारायण पेठ, सम्राट मित्र मंडळ एकता नगर व इतर 

पोलिसांच्या आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ढिसाळपणावर लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून याबाबत न्यायासाठी हरित लवादाकडे जाण्याचा इशारा मुकुंद किर्दत यांनी दिलेला आहे.


लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा