गीता मालुसरेची ऐतिहासिक कामगिरी**९६ दिवसांत तीन खाड्या पार; ‘ओपन वॉटर स्विमिंग ट्रिपल क्राउन’ पटकावला

*गीता मालुसरेची ऐतिहासिक कामगिरी*

*९६ दिवसांत तीन खाड्या पार; ‘ओपन वॉटर स्विमिंग ट्रिपल क्राउन’ पटकावला*

पुणे : पुण्याची ओपन वॉटर जलतरणपटू गीता महेश मालुसरे हिने अवघ्या ९६ दिवसांत इंग्लिश चॅनेल, कॅटालिना चॅनेल आणि न्यूयॉर्कमधील २० ब्रिजेस स्विम पूर्ण करून ‘ओपन वॉटर स्विमिंग ट्रिपल क्राउन’ पटकावला आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय जलतरणपटू ठरली आहे.

गीता हिने जगातील सात प्रमुख खाड्या पोहून ‘क्वीन ऑफ ओशन’ हा बहुमान मिळविण्याचे ध्येय ठेवले आहे. या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना तिने सर्वप्रथम इंग्लिश चॅनेलची कठीण परीक्षा पूर्ण केली. त्यानंतर अमेरिकेतील प्रसिद्ध कॅटालिना चॅनेल तिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत १५ तास ४२ मिनिटांत पोहून पार केला. कॅटालिना चॅनेल पूर्ण करणारी ती भारतातील पाचवी महिला ठरली होती.

यानंतर न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन बेटाभोवतीची २० ब्रिजेस स्विम तिने नुकतीच पूर्ण केली. सुमारे ४६ किलोमीटरचे अंतर ९ तास ३२ मिनिटांत पार करीत तिने ही कामगिरी केली. त्यामुळे इंग्लिश चॅनेल, कॅटालिना चॅनेल आणि २० ब्रिजेस स्विम या तीन आव्हानात्मक जलतरण मोहिमा पूर्ण करून तिने ओपन वॉटर स्विमिंग ट्रिपल क्राउन मिळविला.

अवघ्या ९६ दिवसांत तीन खडतर जलतरण मोहिमा पूर्ण करण्याचा गीता मालुसरे यांचा पराक्रम कमी दिवसात ट्रिपल क्राऊन मिळवणारी गीता जगातील सहावी महिला, आशियातील दुसरी तर भारतातील पहिली महिला ठरली आहे. भारतीय ओपन वॉटर जलतरण क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे. ‘क्वीन ऑफ ओशन’ हे ध्येय पूर्ण करण्याच्या तिच्या प्रवासातील ही महत्त्वाची आणि प्रेरणादायी पायरी ठरली आहे.
 हा संपूर्ण प्रवास अविस्मरणीय ठरल्याचे गीतांनी सांगितले. “ही स्विम माझ्या हृदयात कायम विशेष स्थान ठेवेल,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
गीता यांच्या या प्रवासाची सुरुवात इंग्लिश चॅनेलपासून झाली. जेलीफिशच्या दंशामुळे आलेल्या मोठ्या अडथळ्यानंतर त्यांनी पुन्हा नव्या जोमाने जलतरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सुरुवात केली. प्रत्येक स्विमने आपल्याला नवा धडा दिला आणि मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत केले, असे त्यांनी म्हटले आहे.
कॅटालिना चॅनेल स्वीमिंग दरम्यान दोन्ही हातांना झालेल्या दुखापती हे मोठे आव्हान होते. मात्र, या टप्प्यावर पोहोचण्यासाठी केलेले कठोर परिश्रम, वेदना, त्याग आणि जिद्द लक्षात घेता माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता, असे गीतांनी नमूद केले.
या यशामागे कुटुंबीयांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले. वडील, आई, आजी आणि संपूर्ण कुटुंबाने केलेले त्याग व दिलेला पाठिंबा याबद्दल गीतांनी कृतज्ञता व्यक्त केली.
सराव आणि तयारीच्या काळात साथ दिल्याबद्दल कोच प्रतीक जावडेकर यांचे, तसेच सातत्याने पाठिंबा दिल्याबद्दल शेखर खासनीस यांचे त्यांनी आभार मानले. 20 Bridges Swim साठी स्पॉन्सरशिप केल्याबद्दल Venkys तसेच क्रांती रिअल्टर्स यांचेही त्यांनी विशेष आभार मानले.
याशिवाय अमेरिकेत प्रत्यक्ष मदत करणारे प्रीती सावंत जाधव, सुदीप जाधव, राजवीर जाधव आणि कौस्तुभ हळबे, वैष्णवी कुडले यांनी या संपूर्ण स्विमदरम्यान दिलेल्या पाठिंब्याबद्दल गीतांनी कृतज्ञता व्यक्त केली.
“हे यश केवळ माझे नाही. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या अनेकांचे प्रेम, त्याग, प्रोत्साहन आणि पाठिंबा यामुळे हा प्रवास शक्य झाला,” असे गीतांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
“तीन स्विम्स, तीन धडे, एक अविस्मरणीय प्रवास. ९६ दिवस, एक स्वप्न आणि एक Open Water Swimming Triple Crown,” या शब्दांत गीतांनी आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा आनंद व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा