रोटरी क्लब ऑफ पुणे, शिवाजीनगर आयोजितआंतर रोटरी ‘स्वाती क्षीरसागर करंडक’ एकांकिका स्पर्धेला सुरुवात


रोटरी क्लब ऑफ पुणे, शिवाजीनगर आयोजित

आंतर रोटरी ‘स्वाती क्षीरसागर करंडक’ एकांकिका स्पर्धेला सुरुवात

 

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे, शिवाजीनगरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतर रोटरी ‘स्वाती क्षीरसागर करंडक’ एकांकिका स्पर्धेला आज (दि. २६) सुरुवात झाली. दि. २६ ते दि. ३० ऑक्टोबर या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दीपप्रज्वलन आणि नटराज पूजन करून स्पर्धेला सुरुवात झाली.

रोटरी क्लब ऑफ पुणे, शिवाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, सचिव केदार साठे, डिस्ट्रिक्ट एकांकिका कन्व्हेनर कल्याणी पेंढारकर, को कन्व्हेनर अश्विनी अंबिके, क्लब ॲडमिन डायरेक्टर विजय गोखले, शिरीष क्षीरसागर, तसेच परीक्षक गौरी लागू, प्रवीण जोशी, राहुल लामखडे उपस्थित होते. प्रकाश गायकवाड प्रास्ताविकात म्हणाले, रोटरी क्लबचे सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियातील कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दर वर्षी स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धेचे यंदाचे २७वे वर्ष आहे.

सर्वांगीण विकासासाठी नाटक हे उपयुक्त माध्यम असल्याने रोटरी व्यतिरिक्त इतर संस्थांमधील कुमारवयीन मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी रोटरीतर्फे त्यांना यंदाच्या वर्षीपासून रंगमंच उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे कल्याणी पेंढारकर यांनी सांगितले.

या उपक्रमाअंतर्गत सरहद स्कूल, कात्रज, सृजन पुणे, नाटकाची शाळा या संस्थांचे सादरीकरण झाले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बर्थडे गिफ्ट (रोटरी क्लब ऑफ पुणे, पर्वती), शोध (रोटरी क्लब ऑफ पुणे, एनआयबीएम), ब ब ब बिबट्या (रोटरी क्लब ऑफ पुणे, कात्रज) या एकांकिका सादर झाल्या.

स्पर्धेत सादर होणाऱ्या एकांकिका पाहण्यासाठी पुणेकरांसाठी प्रवेश खुला आहे.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा