मत वाचवा देश वाचवा" या देशव्यापी अभियानाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक तथा कर्नाटकातील हनगल विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. श्रीनिवास माने जी यांनी केले पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.



 

"मत वाचवा देश वाचवा" या देशव्यापी अभियानाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक तथा कर्नाटकातील हनगल विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. श्रीनिवास माने जी यांनी केले पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.

 

     दि. १ नोव्‍हेंबर २०२६ रोजी काँग्रेस पक्षाद्वारे इंडिया आघाडीच्या सहयोगी पक्षांच्या समन्वयाने रामलीला मैदान, नवी दिल्ली येथे भव्‍य राष्ट्रीय रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षातील सर्व ज्येष्ठ मंडळी, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा स्तरीय नेते, ब्लॉक स्तरीय नेते, आघाडी संघटना, विविध सेल विभाग यांचे पदाधिकारी तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व निष्ठावान कार्यकर्ते हे या रॅलीस उपस्थित राहून संविधानीक संस्था ताब्यात घेण्याच्या प्रवृत्तीच्या विरूध्द आवाज उठवून देशाची एकजूट दर्शविणार आहेत.

      सदरची बैठक पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी व पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप व यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

      आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आमदार श्री. श्रीनिवास माने म्हणाले की, ‘‘संविधानाच्या आर्टीकल ३२६ नुसार असलेल्या मतदानाच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण करण्याची लढाई आता निर्णायक टप्प्यात आली आहे. मतदार याद्यांमध्ये मनमानी पध्दतीने नावे वगळून मतदारांचा जो वैधानिक हक्क हिरावण्यात आला आहे, त्याची संपूर्ण चौकशी करून जो पर्यंत जबाबदारी निश्चित केल्या जात नाही तसेच मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करून त्यांच्या विरूध्द न्यायालयीन कार्यवाही केली जात नाही तो पर्यंत हा लढा सुरू ठेवावा लागणार आहे. हे अभियान घटनेने दिलेल्या मतदानाच्या मुलभूत हक्काशी जोडलेले असल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्यांने या मोहिमेत सक्रियपणे सहभागी झाले पाहिजे असे आवाहन केले.’’

      यावेळी माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, पुणे मनपा गटनेते रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, सुनिल मलके, नगरसेवक साहिल केदारी, तस्लीम शेख, माजी नगरसेवक अविनाश बागवे, लता राजगुरू, उस्मान तांबोळी, कैलास गायकवाड, चंद्रशेखर कपोते, राजाभाऊ कदम, सचिन आडेकर, राजेंद्र शिरसाट, लतेंद्र भिंगारे, संतोष डोख, सुरेश नांगरे, धीरज खोरे आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

      बैठकीचे आभार पुणे शहर काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष कैलास गायकवाड यांनी मानले. 


Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा