युवा स्वरानुभूतीतून रसिकांना अनोखी स्वरभेटऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टसर्फे युवा स्वरानुभूती मैफलीचे आयोजन


युवा स्वरानुभूतीतून रसिकांना अनोखी स्वरभेट

ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टसर्फे युवा स्वरानुभूती मैफलीचे आयोजन

पुणे : युवा कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ऋत्विक फाऊंडेशनतर्फे युवा स्वरानुभूती या सांगितीक आयोजन करण्यात येते. या अंतर्गत युवा, आश्वासक गायिका सौम्या कंटक यांचे सुमधुर, सुश्राव्य गायन आणि नितीश पुरोहित यांच्या सरोद वादनाची अनोखी स्वरभेट रसिकांना मिळाली.

कोथरूड येथील ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सौम्या कंटक यांनी कार्यक्रमाची सुरुवात खमाज थाटातील राग धनाश्रीमधील ‘हे म्हारो राजेंद्र’ या पारंपरिक बडा ख्यालने केली. त्यानंतर उस्ताद विलायत हुसेन खानसाहेब यांची ‘तेरो ध्यान धरत दिन रैना’ ही रचना सादर केली. राग ललिता गौरी सादर करताना ‘प्रीतम सैय्या दरस दिखा जा’ हा पारंपरिक बडाख्याल मांडला. ‘ध्रुव मंडल प्रसार हुआ’ ही पंडित निवृत्तीबुवा यांची बंदिश सुमधुरपणे सादर करीत सौम्या कंटक यांनी आपली स्वरांवरील पकड आणि गायनातील तयारी दर्शविली. मैफिलीची सांगता ‘हिरना समझ बुझ बन चरना’ या निर्गुणी भजनाने केली. त्यांना प्रणव गुरव (तबला), निलय साळवी (संवादिनी), इंद्रायणी जोशी, शुभांगी दंताळे (तानपुरा) यांनी समर्पक साथसंगत केली.

मैफलीच्या उत्तरार्धात नितीश पुरोहित यांचे सरोद वादन रंगले. त्यांनी सुरुवातीस राग देसमधील पारंपरिक आलाप, जोड आणि झाला ऐकवून त्यानंतर रूपकमधील गत सादर केली. मिश्र काफी राग ऐकविताना त्यांनी आलाप आणि विलंबित तीनताल व द्रुत तीनताल सादर करून रसिकांना प्रभावित केले. त्यांचे सरोद वादनातील प्रभुत्व पाहून रसिक स्तिमित झाले. पुरोहित यांना ऋषिकेश जगताप (तबला), पुष्कराज आपटे (तानपुरा) यांनी समर्थ साथसंगत केली.

कलाकारांचा सत्कार ऋत्विक फाऊंडेशनच्या संचालिका चेतना कडले यांच्या हस्ते करण्यात आला. श्रुती पोरवाल यांनी निवेदन केले.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा