जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्तरंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे शनिवारी समुपदेशक मानसी कुलकर्णी यांचा सन्मान

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे शनिवारी समुपदेशक मानसी कुलकर्णी यांचा सन्मान
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त लाईफ कोच, मानसशास्त्रीय सल्लागार, समुपदेशक मानसी अभय कुलकर्णी यांचा विशेष सन्मान केला जाणार असून त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात होणार असून सन्मान रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि सल्लागार प्रज्ञा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘मन’ या विषयावर निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात प्रभा सोनवणे, तनुजा चव्हाण, स्वप्नील पोरे, स्वप्नील बापट, गोविंद वाकडे, दीपक होमकर, योगेश रांगणेकर, राहुल हातोले, नूतन शेटे, नचिकेत जोशी, निलाक्षी महाडिक, योगेश काळे, मृणालिनी कानिटकर-जोशी यांचा सहभाग आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा