पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना एका सत्ताधारी भाजपच्या आमदारानेच 90 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या निविदेवरून थेट ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची दमदाटीची भाषा केल्याचे स्वतःच आयुक्तांनी प्रिंट मीडिया/ पत्रकारांना सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात ऑनलाइन कॅमेरा -मीडियासमोर बोलताना मात्र असा कुठलाही प्रकार घडलाच नसून सर्वांशी चांगले संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.

खरे तर ही *अत्यंत गंभीर बाब असून यामध्ये भ्रष्टाचाराच्या सोबतच सत्तेचा माज सुद्धा स्पष्ट होतो आहे*. असे असताना स्वतः *पालिकेचे आयुक्त जर खरी माहिती पुढे आणण्यास घाबरत असतील तर सामान्य पुणेकराने काय करावे?* सत्तेच्या गुर्मीपुढे आयुक्तांनी न झुकता या आमदाराच्या विरोधात त्यांनी स्वतःहून तक्रार दाखल करण्याची गरज आहे. 

यापूर्वी महापालिकेच्या इमारतीमध्येच भाजपाच्या दोन नगरसेवकांमध्ये एका कंत्राटामधील हिश्यावरून जोरदार भांडणे झाली होती आणि ती सोशल मीडिया व इतर मीडिया वरती व्हिडिओ सह व्हायरल झाली होती. आम आदमी पार्टीने यासंदर्भात स्वतः आयुक्तांना लेखी निवेदन दिले होते. त्यावेळेसही याच आयुक्तांनी आपल्या इमारतीमध्ये असे काही घडलेच नाही असा अत्यंत दुबळा मुखवटा धारण केला होता.

एकतर आयुक्त नवल किशोर राम अत्यंत घाबरट असावेत किंवा यांना राज्य सरकारमधील इन्फ्रामॅन आणि *वरिष्ठांनी गप्प बसण्यास सांगून भ्रष्टाचाराला कुरण पुरवण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला गेला असावा* असा आरोप आम आदमी पार्टी चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

- आम आदमी पार्टी

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी