कुमार रियल्टीकडून ‘मॅग्नासिटी’च्या दुसऱ्या फेजचे अनावरणरिअल इस्टेट क्षेत्रात तब्बल ६० वर्षांची यशस्वी वाटचाल



पुणे, दि. २० ऑगस्ट : पुण्यातील आघाडीच्या रिअल इस्टेट विकासकांपैकी एक असलेल्या कुमार रियल्टीने व्यवसायातील ६० वर्षे पूर्ण करत पुणे-सोलापूर महामार्गावरील मांजरी येथे विकसित होत असलेल्या १४० एकरांच्या अत्याधुनिक ‘मॅग्नासिटी’ टाउनशिपमधील दुसऱ्या फेजचे अनावरण केले. कुमार रियल्टीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मनीष जैन यांनी आज शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. जैन कुटुंबातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मैथिली जैन यांचीही यावेळी उपस्थिती होती.

‘मॅग्नासिटी’च्या लोकेशन विषयी बोलताना मनीष जैन म्हणाले, “पूर्व पुण्यातील वेगाने विकसित होणाऱ्या परिसरांपैकी मांजरी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. ‘मॅग्नासिटी’ला ईयॉन आय टी पार्क, एस पी इंफोसिटी आणि सायबरसिटी यांसारख्या प्रमुख आयटी हब्सशी उत्तम कनेक्टिव्हिटी लाभते. तसेच प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंग रोड, मल्टी-मेट्रो कनेक्टिव्हिटी आणि आगामी बुलेट ट्रेन कॉरिडॉर यामुळे या परिसराच्या भविष्यातील विकासाला मोठी चालना मिळणार आहे.”

मॅग्नासिटीच्या या दुसऱ्या फेजमध्ये सेंट्रल ग्रीन्स आणि टाउनशिपमधील विविध सुविधांचे मनोहारी, विहंगम दृश्य अनुभवता येईल अशी घरे उपलब्ध करून देण्यात येणार असून, २ आणि ३ बीएचके सदनिकांचे पर्याय सुमारे ७३ लाख ते १ कोटी रुपयांच्या किंमत श्रेणीत असतील. कुमार रियल्टीच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील ६० वर्षांच्या पूर्ततेनिमित्त घर खरेदीदारांसाठी ३ लाख रुपयांपर्यंतचा विशेष किंमत लाभही देण्यात येत आहे.

१४० एकरांवर विस्तारलेल्या या टाउनशिपमध्ये सुमारे २२ ते २५ टक्के क्षेत्र हिरवाई आणि सुशोभित मोकळ्या जागांसाठी राखण्यात येणार आहे. याशिवाय तब्बल १ लाख चौरस फुटांचा भव्य क्लब विकसित केला जाणार असून, त्यामध्ये स्विमिंग पूल, बँक्वेट हॉल, रेस्टॉरंट, गेस्ट रूम, जिम आणि मिनी थिएटर अशा सुविधा असतील.

टाउनशिपमध्ये अंतर्गत रस्त्यांचे सक्षम जाळे, रिटेल हाय स्ट्रीट, रेस्टॉरंट्स आणि कॅफे, शाळा, रुग्णालय, अग्निशमन केंद्र आणि पोलीस ठाणे यांसारख्या सुविधांचाही समावेश असेल. याशिवाय फुटबॉल पिच, टेनिस कोर्ट, मुलांसाठी खेळण्याची जागा, इनडोअर गेम्स, स्केटिंग रिंक, हिरवाईने नटलेले सिट-आऊट्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान, आउटडोअर जिम आणि योगासाठी स्वतंत्र लॉन अशा विविध सुविधा ‘मॅग्नासिटी’मध्ये विकसित करण्यात येणार आहेत.

कुमार रियल्टीच्या भविष्यातील विस्ताराविषयी बोलताना मनीष जैन म्हणाले, “मॅग्नासिटीच्या फेज २च्या लाँचसह पुण्यातील विविध भागांमध्ये आकाराला येणाऱ्या आगामी प्रकल्पांच्या भक्कम मालिकेमुळे, पुण्याच्या विकासाच्या पुढील टप्प्याला आकार देण्यात कुमार रियल्टी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे. मोठ्या आयटी समुदायाच्या सीईओ, एमडी तसेच वित्त क्षेत्रातील व्यावसायिक आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर्स गरजा यांच्या लक्षात घेऊन हाय-मिड-इन्कम आणि लक्झरी श्रेणीतील निवासी प्रकल्पांवर आमचा भर राहणार आहे. बाजारपेठ समजून घेणे, ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे आणि मोठ्या प्रमाणावर दर्जेदार प्रकल्प साकार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. पुणे शहरातील या श्रेणीमध्ये कुमार रियल्टीच्या विविध प्रकल्पांमधून दरवर्षी किमान २,००० सदनिका वितरित करण्याचे आमचे लक्ष्य आहे.”

पत्रकार परिषदेत बोलताना जैन म्हणाले कि पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याची अत्यंत गरज आहे. पुणे हे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC) साठी कार्यालये सुरू करण्याचे देशातील पहिले पसंतीचे ठिकाण बनावे, यासाठी वाहतूक कोंडीची समस्या सोडवणे महत्त्वाचे आहे. मेट्रो आणि शहर बससेवेसारखी कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तसेच रस्त्यांची चांगली स्थिती याला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक असल्याचेही जैन यांनी सांगितले.

कुमार रियल्टीची स्थापना १९६६ मध्ये केसरिमल आणि विमलकुमार जैन यांनी केली. आजवर कंपनीने १४० हून अधिक रिअल इस्टेट प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, सुमारे ३६ दशलक्ष चौरस फुटांचा विकास केला आहे. आतापर्यंत ४२,००० कुटुंबांना त्यांनी घरे उपलब्ध करून दिली आहेत.

भाडेतत्त्वावरील घरांच्या प्रकल्पांपासून सुरू झालेल्या कुमार रियल्टीने पुढे निवासी प्रकल्प, व्यावसायिक प्रकल्प आणि आयटी पार्क्सच्या माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यानंतर मेगापोलिस आणि मॅग्नासिटीसारख्या एकात्मिक टाउनशिपच्या विकासात कंपनीने प्रवेश केला. पुण्याबरोबरच मुंबई आणि बंगळुरूमध्येही कंपनीने आपल्या विस्ताराची मुहूर्तमेढ रोवली असून, या शहरांमध्ये उल्लेखनीय निवासी प्रकल्प साकारले आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कंपनीला अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*