पंचशील ग्रुपचे अतुल चोरडिया यांनी शेतकरी कुटुंब जमीन बळकावली ?* *( खराडीतील चौधरी कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेवून केला आरोप

पुण्यातील नामांकित बांधकाम व्यवसायिक तसेच पंचशील ग्रुपचे अतुल चोरडिया यांनी खराडी येथील शेतकरी असलेल्या चौधरी कुटुंबाची शेती बळकावल्याने
हवालदिल झालेल्या चौधरी कुटुंबाने नुकतीच श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी कैफियत मांडली. या प्रसंगी शेतकरी राजाभाऊ चौधरी, सौरभ चौधरी, शुभम चौधरी, सुनील चौधरी हे उपस्थित होते.

 या प्रसंगी बोलताना राजाभाऊ चौधरी म्हणाले की आमच्या कुटुंबाची वडिलोपार्जित असणाऱ्या जमिनीवर आमची ताबे वहिवाटीत अनेक वर्षांपासून आहे. सदर जमीन बळकवण्यासाठी चोरडिया यांनी गुंडाचा व पोलिसांचा वापर करून जागा बळकावली आहे. सदरील जागेत चोरडिया यांनी त्यांचे गुंड पाठवून वेळोवेळी ते दमदाटे करून जीवे मारण्याची धमकी देतात तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन देखील त्यांनी कोणतेही मदत केली नाही. 

ते पुढे म्हणाले की न्यायालयात वाद विवाद चालू असताना सुभाष बाबूलाल मुथ्था यांनी खोटया सहया, खोटा झोन दाखला, याचा वापर करून २००५ साली कोर्ट कमिशन यांची दिशाभुल करून खरेदीखत केले. त्यानंतर २०२३ साली डेल्टस्टार इस्टेट कं.प्रा.लि. तर्फे अधिकृत स्वाक्षरी करीता अदित्य बंसल मखीजा ला त्यावेळी मुथ्था व डेल्टस्टार यांनी संगनमत करून मुळ खरेदीखतातील चर्तुसिमा बदली करून खरेदीखत केले. त्यानंतर त्यांनी प्लॉटवर येऊन आमचे ताबेवहिवाटीत असलेल्या जागेत गुंडांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पो. निरिक्षक व इतर यांनी कागदपत्राची कोणतीही शहानिशा न करता आमच्यावर गुन्हे दाखल केले. आमच्या जागेत जे गुंड आले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. अशी आम्ही विनंती केली तरी देखील त्यांनी आमची तक्रार घेतली नाही. 

त्यानंतर चौधरी परिवारांने पुणे शहराचे पोलिस आयुक्त साहेब यांना ५ ते ६ वेळा लेखी स्वरूपात व समक्ष भेटून तक्रारीरी अर्ज दिले. त्यावर आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. तसेच गुन्हयाचा तपास मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनी त्यांचा जाब जबाब नोंदविला. त्यानंतर त्यांनी प्लॉटवर मुथ्था, मखीजा, दर्शन चौरडिया, वंदना चौघुले व इतर यांचेबरोबर ताबेतील प्लॉटवर येवून त्यांच्या शेडचे कुलूप तोडले व त्यांचा नावाचा बोर्ड काढण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर तक्रारी अर्जाचा तपास विमानतळ पोलिस स्टेशनकडे वर्ग केला. त्यांनी आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. वरील सर्व प्रकार पंचशील ग्रुपचे अतुल चौरडिया यांच्या वरदहस्ताने पोलिस अधिकारी व गुंड हे आमच्यावर अन्याय करत आहेत. एकीकडे पुणे शहराचे पोलिस आयुक्त असे अहवान करतात की, पोलिसांनी जमीनीच्या वादामध्ये पडून बिल्डरशी तोडपाणी करत असतील तर आमच्याकडे तक्रार करा. त्यावर आम्ही तर ५ ते ६ वेळा तक्रार अर्ज केले असून समोरील लोकांवर कोणतीही कारवाई केली नाही. तर तोडपाणी करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई होणार ?

 आमच्या कुटुंबावर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यासाठी पोलिस प्रशासन जबाबदार राहील. आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही पोलिस आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत. असा इशारा शेतकरी राजाभाऊ चौधरी व सुनिल चौधरी यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!