नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

पुणे, २१ ऑक्टोबरः क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित पहिल्या ‘नॉक-९९ करंडक’ दिवस-रात्र १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धेत कोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.

टेंभेकर फार्म्स, सातारा रस्ता येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सक्षम लढ्ढा याच्या अष्टपैलू खेळीमुळे कोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीने पीआयओसी क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ३४ धावांनी सहज पराभव केला. कोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीने पहिल्यांदा फलंदाजी करताना १६० धावांचे आव्हान उभे केले. समरसिंग जाधवराव (४८ धावा), आराध्या चौकारी (२२ धावा), अव्देत अमोंडकर (२२ धावा) आणि सक्षम लढ्ढा (१६ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या धावसंख्येचा पाठलाग करताना पीआयओसीचा डाव १२६ धावांवर मर्यादित राहीला. सक्षम लढ्ढा याने १० धावात २ गडी बाद केले.

ओंकार पलापुरे याच्या अचूक गोलंदाजीच्या मदतीने जस क्रिकेट अ‍ॅकॅडमीने पीआयओसी संघाचा १०२ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळताना जस क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १८७ धावा धावफलकावर लावल्या. निपुन आर. याने ५७ धावांची आणि कृष्णा बाहेती याने ५७ धावांची खेळी करून संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. या लक्ष्यासमोर पीआयओसीचा डाव ८५ धावांवर गडगडला. ओंकार पलापुरे याने १३ धावात ३ गडी बाद केले. नित्यन जोशी यानेसुद्धा २ धावात २ गडी टिपले.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
कोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ५ गडी बाद १६० धावा (समरसिंग जाधवराव ४८, आराध्या चौकारी २२, अव्देत अमोंडकर २२, सक्षम लढ्ढा १६, अर्णव कड २-४१) वि.वि. पीआयओसीः १९.२ षटकात १० गडी बाद १२६ धावा (पियुष कापके १४, अर्णव कड १३, सक्षम लढ्ढा २-१०); सामनावीरः सक्षम लढ्ढा;

जस क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ३ गडी बाद १८७ धावा (निपुन आर. ५७ (३९, ९ चौकार), कृष्णा बाहेती ५७ (४०, १० चौकार), ध्रुव जाधव २२) वि.वि. पीआयओसीः २० षटकात १० गडी बाद ८५ धावा (अनुष्का राठोड २१, शर्विल गुरप १५, ओंकार पलापुरे ३-१३, नित्यन जोशी २-२); सामनावीरः ओंकार पलापुरे;

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण