पुणे शहरातील रस्ते होताय मृत्यूचे सापळेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन


पुणे शहरातील विविध रस्त्यांवर रोज अनेक नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. पुण्यातील रस्ते आहेत की एखादी युद्धभूमी अशी अवस्था सध्या शहरात आहे. या परिस्थितीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात कोंढवा-कात्रज रस्त्यावरील गोकुळनगर येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
पुणे शहरातील कात्रज - कोंढवा रोड येथे सुरू असलेल्या कामातील ठेकेदार व प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे काही दिवसांपूर्वी खड्ड्यातील पाण्यात बुडून एका मुलीचा दुःखद मृत्यू झाला, तसेच पीएमपीएमएल बसच्या धडकेने एका महिलेचा मृत्यू झाला. 
प्रशासनाचा अंदाधुंद कारभार व तिघाडी सरकारचे ठेकेदार धार्जिणे धोरण यामुळे प्रत्येक पुणेकर रोज जीव मुठीत घेऊन जगत आहे असा संताप यावेळी प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला. 
या सर्व दुर्देवी घटनांचा तीव्र निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. "तिघाडी सरकार जीवघेणे सरकार, तिघाडी सरकार पुणेकरांचे कर्दनकाळ, तिघाडी सरकार किती जीव घेणार" अशा घोषणांनी संपूर्ण कोंढवा-कात्रज परिसर दणाणून गेला होता.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अमृताताई बाबर, दीपक कामठे, डॉ.सुनील जगताप, प्रविण तुपे, हेमंत बधे, बाळासाहेब कवडे,मंगेश चव्हाण,स्वाती चिटणीस, मौलाना शौकीन, रूपालिताई शेलार, माऊली मोरे, पप्पू घोलप, मोहमदद्दीन खान आणि खूप मोठ्या संख्येने पदाधिकारी व कायकर्ते उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!