पुण्यनगरीचा खासदार म्हणून पुणेकर जनतेने संधी दिली आणि आता केंद्रीय राज्यमंत्री पदावरही काम करण्याची संधी मिळाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याला, हितचिंतकांना


पुण्यनगरीचा खासदार म्हणून पुणेकर जनतेने संधी दिली आणि आता केंद्रीय राज्यमंत्री पदावरही काम करण्याची संधी मिळाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याला, हितचिंतकांना आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना मनापासून आनंद झालेला आहे. हा आनंद आपण येत्या शनिवारी प्रत्यक्ष भेटून साजरा करूयात. प्रत्यक्ष भेटून आनंद साजरा करण्यात आणि तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा स्विकारण्यात मला निश्चितच मोठं समाधान मिळेल.

आपणा सर्वांना मनापासूनची विनंती आहे. आपण कोणीही अनधिकृत बॅनर्स, फ्लेक्स लावत आपल्या भावना व्यक्त करू नयेत, ही विनम्र विनंती आणि जर असे बॅनर्स लागले असतील, तर ते तातडीने काढावेत ही सर्वांना विनंती आहे !

आपण बुके, हार, शाल, गुलाल, फटाके आणि काही वेगळं करण्याऐवजी प्रत्यक्ष भेटून-बोलून आनंद साजरा करुयात, अशी माझी स्वतःची इच्छा आहे.

आपला,
श्री. मुरलीधर मोहोळ

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!