एमसीए आणि महाराष्ट्र प्रीमियर लीगने फ्रॅंचाईजी रायगड रॉयल्ससह औरत हैं, तो भारत है कार्यक्रमाच्या सादरीकरणातून यशाचा आनंद व्यक्त केला.

पुणे, 14 जुन 2024: महाराष्ट्र प्रिमिरयर लीग ही महाराष्ट्रातील एकमेव ट्वेन्टी-२० किकेट लीग आहे. याची सुरुवात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने करण्यात आली. महाराष्ट्रातील महिलांच्या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी आता एमपीएलने 'औरत हैं ते भारत है...' या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

हा कार्यक्रम शनिवारी १५ जून रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय मैदानावर सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या विविध भागातील ५ हजारहून अधिक महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्र प्रिमियर लीगने आमंत्रित करण्यात आलेल्या महिलांसाठी वाहतूक आणि भोजनाची सर्व समावेशक व्यवस्था देखिल करण्यात आली आहे. या वेळी उपस्थित प्रत्येकाला रायगड रॉयल्सच्यावीने कौतुकाचे प्रतिक म्हणून या कार्यक्रमासाठी रायगड रॉयल्सने खास निर्माण केलेली 'औरत हैं, तो भारत है ' ही खास जर्सी भेट म्हणून देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नावलौकिक मिळालेल्या नामवंत महिलांचा समावेश असणार आहे. सन्मानित करण्यात येणाऱ्या महिलांमध्ये प्रामुख्याने आदिती तटकरे, (महिला व बाल विकास मंत्री, ऑलिम्पियन अंजली भागवत, मेरी कोम, राही सरनोबत, अनु आगा, सुलजा फिरोदिया अशा अनेक गणमान्य महिलांचा समावेश आहे.

या महिलांना कार्यक्रमाचे निमंत्रण एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या हस्ते देण्यात येणार असून, निमंत्रणाबरोबर देण्यात येणाऱ्या भेटीत 'औरत है तो भारत है जर्सी 'आणि गुलाबी दुपट्ट्याचा समावेश आहे.रायगड रॉयल्स वि. पुणेरी बाप्पा यांच्यातील सामन्यापूर्वी हा सोहळा पार पडणार आहे. या वेळी संघातील प्रत्येक खेळाडू हा आपल्या आईसोबत राष्ट्रगीतासाठी उभा राहिल. हे दोन्ही संघ त्या दिवशी 'औरत है तो भारत है' जर्सी परिधानकरूनच खेळतील. आई बद्दल असणारा आदेर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक खेळाडूच्या जर्सीमागे त्याच्या आईचे नाव लिहिलेले असेल.

महाराष्ट्रातील अपवादात्मक महिलांचा सन्मान करण्यात येणार असल्यामुळे या सोहळ्याला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन एमसीए आणि एमपीएलने केले आहे.

कार्यक्रमाविषयी..
कार्यक्रमाचे नाव - औरत है, तो भारत है
तारीख - शनिवार १५ जून २०२४
वेळ - सायंकाळी ६ वाजता
स्थळ - एमसीए आंतरराष्ट्रीय मैदान, गहुंजे, पुणे

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!