तिसऱ्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत किड्स गटात ऍव्हेंजर्स संघाची विजयी आगेकूच कायमखुल्या गटात स्ट्रायकर्स, निंजाज संघांचे विजय

पुणे, 14 जुन 2024: पीवायसी हिंदु जिमखाना तर्फे आयोजित तिसऱ्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत साखळी फेरीत किड्स गटात ऍव्हेंजर्स संघाने सलग तिसरा विजय मिळवला. 

पीवायसी हिंदू जिमखाना क्लब येथील मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत किड्स गटात पहिल्या सामन्यात ओजस नाईक(4, 18मि.) याने नोंदवलेल्या दोन गोलाच्या जोरावर ऍव्हेंजर्स संघाने गार्डियन्स संघाचा 2-1 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात ऍव्हेंजर्स संघाने शिल्ड संघाचा 4-3 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. विजयी संघाकडून विहान राठोड(3,10मि.)याने दोन गोल तर, संवित कासट(12मि.), ओजस नाईक(15मि.)यांनी प्रत्येकी एक गोल केला. 

खुल्या गटात पहिल्या लढतीत टस्कर्स संघाने वायकिंग्स संघाचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. टस्कर्सकडून अविष्कार हुलयलकर(8मि.), जेहान कोठारी(7मि.), परीतोष शेट्टी( 14मि.), दर्शन कांकरिया(22मि.), सिद्धांत पवार(26मि.) यांनी प्रत्येकी एक केला. दुसऱ्या लढतीत यश भिडे(4,12,18मि.)याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर स्ट्रायकर्स संघाने टायटन्स संघाचा 6-0 असा पराभव केला. 

 अन्य लढतीत स्ट्रायकर्स संघाने वॉरियर्स संघाचा 6-1 असा धुव्वा उडवत आगेकूच केली. स्ट्रायकर्स संघाकडून यश भिडे(2,4,10,19 मि.), याने चार गोल, तर चिनार ओक(13 मि., क्षितिज लोहिया(23 मि.)यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात निंजाज संघाने ग्लॅडिएटर्स संघावर 7-1 असा विजय मिळवला. विजयी संघाकडून तनिश दादलानी(4,5,17,25 मि.) याने चार गोल, यश काळे(22, 24मि.)याने दोन गोल आणि श्रीनिवास चाफळकर(28 मि) याने एक गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.निकाल: साखळी फेरी: किड्स गट:
ऍव्हेंजर्स: 2(ओजस नाईक 4, 18मि.) वि.वि.गार्डियन्स: 1(अनय इंगळहळीकर 10मि.); सामनावीर - आरुष दिवेकर

ऍव्हेंजर्स: 4(विहान राठोड 3, 10मि., संवित कासट 12मि., ओजस नाईक 15मि.) वि.वि.शिल्ड: 3(निरन भुरट 5, 20मि., अगस्त्य कुंटे 16मि.); सामनावीर - संवित कासट;

खुला गट: 
टस्कर्स: 5(अविष्कार हुलयलकर 8मि., जेहान कोठारी 7मि., परीतोष शेट्टी 14मि., दर्शन कांकरिया 22मि., सिद्धांत पवार 26मि.)वि.वि. वायकिंग्स: 0; सामनावीर - दर्शन कांकरिया

स्ट्रायकर्स: 6(यश भिडे 4,12,18मि., विश्व रुकारी 16,25मि., चिनार ओक 21मि.)वि.वि.टायटन्स: ०; सामनावीर - 

स्ट्रायकर्स: 6 (यश भिडे 2,4,10,19 मि., चिनार ओक 13 मि., क्षितिज लोहिया 23 मि.) वि.वि. वॉरियर्स: 1(प्रेरित गोयल 25 मि.); सामनावीर - यश भिडे

निंजाज: 7(तनिश दादलानी 4,5,17,25 मि., यश काळे 22, 24मि., श्रीनिवास चाफळकर 28 मि.) वि.वि. ग्लॅडिएटर्स: 1 (विक्रम भावे 14 मि.); सामनावीर - तनिश दादलानी.


Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!