महिलांनी उद्योग,व्यवसायात मोठ्या संख्येंने यावे* - *शैलेश रजपूत*—- फिक्की महिला आघाडीच्या वतीने उद्योजकता महिला मेळावा संपन्न

पुणे दि —— आज महिला प्रत्येक क्षेत्रात यशाचे शिखर पार करीत आहेत यशस्वी होत आहेत . त्याप्रमाणेच आता महिलांनी उद्योग,व्यवसायात मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची गरज असल्याचे मत पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश रजपूत यांनी व्यक्त केले .फिक्की महिला आघाडीच्या वतीने महिला उद्योजकता मेळावा पुण्यात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते .
             पुढे ते म्हणाले की ,आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी नव उद्योजकांना घडवण्यासाठी विविध योजना आणल्या आहेत . बऱ्याच योजमार्फत अनुदानदेखील देण्यात येत आहे .या व अशा अनेक योजनांचा लाभ महिलांनी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले .या महिला उद्योजिकता मेळाव्याच्या समन्वयक सुरभि प्रकाश दीक्षित यांनी या कार्यक्रमाची भूमिका उपस्थित महिलांना सांगितली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फिक्की महिला आघाडीच्या पुणे अध्यक्षा पिंकी राजपाल होत्या .या कार्यक्रमास पुणे शहर व जिल्हा व विभागातून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या .यावेळी महिलांना विविध क्षेत्रात उपयुक्त अशा महिला विशेषाधिकार कार्ड चे उद्घाटन करण्यात आले .
           यावेळी पुणे उद्योग विभागाचे संचालक शैलेश रजपूत ,फिक्की पुणे च्या अध्यक्षा पिंकी राजपाल ,या कार्यक्रमाच्या समन्वयीका सुरभि प्रकाश दीक्षित ,निमिषा ढाकरे यासह फिक्की महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी तसेच महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे आणि जिल्ह्या उद्योग केंद्राचे प्रमुख अधिकारी यांनी महिलांना उद्योगविषयक मार्गदर्शन केले .

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!