गंगाधाम चौक येथे भरधाव ट्रकने श्रीमती दमयंती सोळंकी यांना चिरडले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभा मतदार संघाच्यावतीने मार्केटयार्ड पोलिस स्टेशन व बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.


काल बुधवार दि.१२ जुन २०२४ रोजी गंगाधाम चौक येथे भरधाव ट्रकने श्रीमती दमयंती सोळंकी यांना चिरडले व त्यांचा जागीच मृती झाला. यापूर्वी देखील सदर रस्त्यावर अनेकदा अपघात झालेले आहेत. त्याबाबत आम्ही प्रशासनाकडे सदर ठिकाणी बसविण्याची मागणी करुन देखील वाहतुक पोलिसांकडून NOC दिली जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता झालेल्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण ? प्रशासन, वाहतुक पोलीस, नशेमध्ये असणारा चालक की अजुन कोणी याचे उत्तर मिळालेच पाहिजे व त्यावर कायदेशील कार्यवाही झाली पाहिजे. 

सदर भागामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत. येथील रस्त्यावर दिवसा अवजड वाहने येण्यास बंदी असताना देखील सदर वाहने सरासपणे येथे येत असतात व त्याकडे वाहतुक पोलिसांकडून जाणीवपूर्वक अर्थपुर्ण दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ओव्हर लोड ट्रक, मिक्सर, खडी, क्रशसैंड, सिमेंट व स्टीलचे ट्रक भरभरून येत असल्याने येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन याठिकाणी प्रवास करावा लागत आहे. तसेच गंगाधाम चौकापासून आई माता मंदिराकडे जाताना चढाचे असणारे प्रमाण कमी करावे. 

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभा मतदार संघाच्यावतीने मार्केटयार्ड पोलिस स्टेशन व बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे, कार्याध्यक्ष रामदास गाडे, महिलाध्यक्षा श्वेता होणराव, दिलीप अरुंदेकर, प्रशांत कुदळे, सतीश वाघमारे, मनीषा बगाडे, विजय बगाडे, करण गायकवाड, वैशाली जगताप आदि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!