महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत छत्रपती संभाजी किंग्सचा चौथा विजय ओम भोसले(नाबाद ८१धावा)ची खेळी

पुणे, १३ जून २०२४: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत तेराव्या दिवशी दुसऱ्या लढतीत ओम भोसले(नाबाद ८१धावा) व मुर्तझा ट्रंकवाला(४७धावा)यांच्या धडाकेबाज शतकी सलामी भागीदारीच्या जोरावर छत्रपती संभाजी किंग्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा ८ गडी राखून पराभव करत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.   

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत छत्रपती संभाजी किंग्स संघासमोर विजयासाठी १५२ धावांचे आव्हान होते. हे आव्हान त्यांनी १७.५ षटकात २बाद १५५धावा करून पूर्ण केले. आघाडीचा फलंदाज ओम भोसलेने ५४चेंडूत नाबाद ८१ धावांची सुरेख खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने १०चौकार व १ षटकार मारला. त्याला मुर्तझा ट्रंकवालाने ४०चेंडूत ४चौकार व १ षटकारासह ४७धावांची खेळी करून साथ दिली. या सलामीच्या जोडीने ७६ चेंडूत ११४ धावांची भागीदारी करून सामन्यावर आपली पकड भक्कम केली. मुर्तझा ट्रंकवाला विजय पावलेच्या गोलंदाजीवर त्रिफळा ४७ धावांवर बाद झाला. पाठोपाठ दिग्विजय पाटील(३)धावांवर त्रिफळा बाद होऊन तंबूत परतला. ओम भोसलेने दिग्विजय पाटील(नाबाद ८)च्या साथीत संघाचा विजय सुकर केला. 

तत्पूर्वी, रत्नागिरी जेट्स संघाने संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६बाद १५२धावा केल्या. सलामवीर धीरज फटांगरे(२७) व प्रीतम पाटील(१४)या सलामीच्या जोडीने २१चेंडूत ३३धावांची भागीदारी केली. मात्र, हि जोडी फुटताच धावगतीला ब्रेक लागला. कर्णधार अझीम काझी(९), दिव्यांग हिंगणेकर(९) मधली फळी देखील तंबूत परतली. त्यानंतर किरण चोरमलेने ३१चेंडूत नाबाद ४१ धावांची खेळी करून धावफलक हलता ठेवला. त्यात त्याने ४चौकार व १षटकार मारला. त्याला अभिषेक पवारने २१चेंडूत ४चौकार व १ षटकाराच्या मदतीने ३४ धावा करून साथ दिली. अभिषेक ३४ धावांवर असताना पायाच्या दुखापतीमुळे बाहेर जावे लागले. किरण व अभिषेक वगळता अन्य फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. छत्रपती संभाजी किंग्सकडून हितेश वाळुंज(२-२४), आनंद ठेंगे(२-४३) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.     संक्षिप्त धावफलक 
रत्नागिरी जेट्स: २०षटकात ६बाद १५२धावा(किरण चोरमले नाबाद ४१(३१,४x४,१x६), अभिषेक पवार ३४(२१,४x४,१x६), धीरज फटांगरे २७, प्रीतम पाटील १४, हितेश वाळुंज २-२४, आनंद ठेंगे २-४३) पराभुत वि.छत्रपती संभाजी किंग्स: १७.५ षटकात २ बाद १५५धावा(ओम भोसले नाबाद ८१(५४,१०x४,१x६), मुर्तझा ट्रंकवाला ४७(४०,४x४,१x६), विजय पावले २-३२); सामनावीर - ओम भोसले.    

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!