महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत मुर्तझा ट्रंकवालाची विक्रमी शतकी खेळी छत्रपती संभाजी किंग्सचा ईगल नाशिक टायटन्सवर धडाकेबाज विजय ईगल नाशिक टायटन्सच्या मंदार भंडारी(नाबाद १०२)ची शतकी खेळी व्यर्थ

पुणे, १४ जून २०२४: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत चौदाव्या दिवशी कर्णधार मूर्तझा ट्रंकवालाने(१२२धावा) याने केलेल्या विक्रमी शतकी खेळीच्या जोरावर छत्रपती संभाजी किंग्स संघाने ईगल नाशिक टायटन्स संघाचा ७ गडी राखून पराभव करत आजचा दिवस गाजवला. एमपीएलमधील छत्रपती संभाजी किंग्सच्या मुर्तझा ट्रंकवाला(१२२)ने विक्रमी शतक, तर ईगल नाशिक टायटन्सच्या मंदार भंडारी(नाबाद १०२) यांनी पहिले शतक साजरे केले. 

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत छत्रपती संभाजी किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचं निर्णय घेतला. सलामवीर अर्शिन कुलकर्णी खाते न उघडताच तंबूत परतला. त्याला प्रणय सिंगने पहिल्याच षटकात तिसऱ्या चेंडूवर त्रिफळा बाद केले. त्यानंतर मंदार भंडारी व साहिल पारख यांनी दुसऱ्या विकेटसाठी १५चेंडूत ३४ धावांची भागीदारी केली. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात साहिल पारख १७ धावांवर झेल बाद झाला. मंदार भंडारीने कौशल तांबेच्या समवेत तिसऱ्या विकेटसाठी ७९ चेंडूत १२९ धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. कौशल तांबेने ४० चेंडूत ४चौकार व १षटकाराच्या मदतीने ४६ धावा केल्या.  
मंदारने एकाबाजूने आक्रमक खेळी करत ५८चेंडूत नाबाद १०२ धावांची खेळी केली. त्यात त्याने ६चौकार व ७ षटकार ठोकत आपले शतक साजरे केले. एमपीएलमधील या मौसमातील मंदार भंडारीचे पहिले शतक ठरले. मंदार व धनराज शिंदे यांनी चौथ्या विकेटसाठी २० चेंडूत ४७ धावांची भागीदारी करून संघाला २१२धावांचे लक्ष्य उभे करून दिले. २१२ धावांचे आव्हान छत्रपती संभाजी किंग्स संघाने १९.५ षटकात ३बाद २१३धावा काढून पूर्ण केले. ओम भोसले व मुर्तझा ट्रंकवाला यांनी पहिल्या विकेटसाठी ८३ चेंडूत १४४ धावाची धडाकेबाज सलामी दिली. ओम भोसलेने ४१चेंडूत ५९धावांची खेळी करून साथ दिली. त्यात त्याने ४चौकार व ३षटकार मारले. मुर्तझाने एकाबाजूने आक्रमक खेळी करत संघाचा धावफलक हलता ठेवला. मुर्तझाने ६३चेंडूत १२२धावांची विक्रमी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने ११चौकार व ७टोलेजंग षटकार ठोकून मैदान दणाणून सोडले. ओम भोसले आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात ५९धावांवर बाद झाला. त्यानंतर मूर्तझाने व ओमकार खाटपेच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी ३०चेंडूत ५५ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. छत्रपती संभाजी किंग्सला शेवटच्या ६चेंडूत १४धावांची आवशक्यता होती. त्यावेळी मुकेश चौधरीच्या पहिल्याच चेंडूवर मुर्तझा आक्रमक फटका मारताना त्रिफळा बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या सौरभ नवलेने सुरेख षटकार खेचून विजयाचे अंतर आणखी कमी केली. ३चेंडूत ७धावांची गरज असताना राजवर्धन हंगर्गेकरने षटकार खेचला व पुढच्याच चेंडूवर एक धाव घेत संघाचा विजय सुकर केला.  

निकाल: साखळी फेरी:
ईगल नाशिक टायटन्स: २० षटकात ३बाद २१२धावा(मंदार भंडारी नाबाद १०२(५८,६x४,७x६), कौशल तांबे ४६(४०,४x४,१x६), धनराज शिंदे नाबाद ३०(१२,१x४,४x६), साहिल पारख १७, प्रणय सिंग २-३५, आनंद ठेंगे १-४४) पराभुत वि. छत्रपती संभाजी किंग्स: १९.५ षटकात ३बाद २१३धावा(मुर्तझा ट्रंकवाला १२२(६३,११x४,७x६), ओम भोसले ५९(४१,४x४,३x६), राजवर्धन हंगर्गेकर नाबाद ७, सौरभ नवले नाबाद ७, रेहान खान १-२२, समाधान पांगरे १-४२, मुकेश चौधरी १-४२);सामनावीर - मुर्तझा ट्रंकवाला.         

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!