पुणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत पब/ रुफ टॉप हॉटेल्स/लेट नाईट हॉटेल्स वरती येत्या आठ दिवसात कडक कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार - मा. दीपक मानकर"



 पुणे शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये विविध भागात अनधिकृत पणे चालणारे पब, रूफ टॉप हॉटेल्स, लेट नाईट हॉटेल्स यांवरती कडक कारवाई करून पुढील ८ दिवसात हे त्वरित बंद करण्यात यावेत अन्यथा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पुणे शहराध्यक्ष माननीय श्री दीपक मानकर यांनी दिला आहे.
पुणे हे विद्येचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराच्या संस्कृतीला धक्का लागणारे प्रकार घडत आहेत.त्याला तरुण-तरुणींची अनधिकृतपणे सुरु असलेल्या पब/लेट नाईट हॉटेल्स/रुफ टॉप हॉटेल्स मुळे होत असलेली नाईट-लाईफ हे कारणीभूत ठरत असल्याचे समोर येत आहेत. यामुळे तरुण-तरुणी व्यसनांच्या अधीन जात असताना दिसत आहेत. 
 पुणे शहरातील युवक-युवतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून यांचे परिणाम अपघातांच्या माध्यमातून पुणे शहरात दिसून येत आहेत. 
                  पुणे शहरातील अनेक तरुण-तरुणी विविध प्रकारची व्यसने खुलेआम करीत आहेत. त्यांना महाविद्यालयांच्या परिसरामध्येच व्यसनांसाठी लागणारे उत्तेजक पदार्थ खुलेआम मिळत आहेत त्यावर कडक कारवाई व्हावी. तसेच पुणे शहरातील तरुणाई व्यसनाच्या जाळ्यात फसलेली असतानाच पुणे शहरामध्ये विविध भागात अनधिकृतपणे पब/लेट नाईट हॉटेल्स/रुफ टॉप हॉटेल्स चालत आहेत. त्याबाबत कसल्याच परवानगी घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दारू पिऊन होणारे गंभीर अपघात होणे, आग लागण्याच्या घटना घडणे, गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत आहेत. 
प्रत्येकवेळी कारवाईचा बडग्याचा फार्स फक्त या पब/लेट नाईट हॉटेल्स/रुफ टॉप हॉटेल्स च्या मॅनेजर व कर्मचारी यांच्यापुरता मर्यादित ठेऊन त्यांच्या मूळ मालकांना नेहमीच मोकळीक देण्यात येते. त्यामुळे कल्याणीनगर,विमाननगर,कोरेगाव पार्क, मुंढवा तसेच राजा बहादूर मिल परिसरातील 2 BHK यांसारखे असंख्य पब/लेट नाईट हॉटेल्स/रुफ टॉप हॉटेल्स मध्यरात्री उशिरापर्यंत चालू ठेवले जातात. अशा अनधिकृत आणि वेळेची मर्यादा न पाळणाऱ्या पब/लेट नाईट हॉटेल्स/रुफ टॉप हॉटेल्सच्या मालकांवर कडक कारवाई करून त्या मालकांची नावे दैनिक वृतपत्रांमध्ये जाहीर करावीत अशी मागणी माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण