‘कै. कॅप्टन शिवरामपंत व्हि. दामले करंडक’ १९ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाराजस्थान रॉयल्स् अ‍ॅकॅडमी पुणे संघाचे सलग दोन विजय; २२ याडर्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी !!

पुणे, २४ मेः महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित ‘कै. कॅप्टन शिवरामपंत व्हि. दामले करंडक’ १६ वर्षाखालील आंतरक्लब टी-२० क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्स् अ‍ॅकॅडमी पुणे संघाने सलग दोन विजय तर, २२ याडर्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली.

मुकूंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या कटारीया हायस्कूल मैदान आणि सिंहगड रस्ता येथील कोद्रे फार्म्स मैदानावर झालेल्या सामन्यात समर्थ काशिद याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स् अ‍ॅकॅडमी पुणे संघाने पुणे इन्स्टिट्युट ऑफ क्रिकेटचा १५८ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना शोर्य पांचाळ (५८ धावा), अव्देत वानखेडे नाबाद (४५ धावा), अर्णव बोम्बे (४२ धावा) आणि आर्कष यादव (३० धावा) यांनी संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. या आव्हानासमोर पुणे इन्स्टिट्युट ऑफ क्रिकेटचा डाव ६८ धावांवर गडगडला. दुसर्‍या सामन्यात राजस्थान रॉयल्स् अ‍ॅकॅडमी पुणे संघाने क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीचा ३ गडी राखून सहज पराभव केला. सामन्यामध्ये सोहम गाढवे याची अष्टपैलु कामगिरी महत्वाची ठरली.

तनुश आपटे याच्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर २२ याडर्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीने स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिक संघाचा ८ धावांनी निसटता विजय मिळवून आगेकूच केली. ऋत्विक रडे याने फटकावलेल्या ८९ धावांच्या जोरावर आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने सनराईज क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा १४० धावांनी सहज पराभव केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ७ गडी बाद १३३ धावा (राज देवोकर ४६, सम्यक सहस्त्रबुद्धे २४, श्वेतांग चर्तुवेदी २-१५, सोहम गाढवे २-२६) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स् अ‍ॅकॅडमी पुणेः १९.४ षटकात ७ गडी बाद १३४ धावा (आदित्य वाईकर २८, नील गांधी २८, सोहम गाढवे नाबाद २६, राज टिंगरे ४-२७); सामनावीरः सोहम गाढवे;

२२ याडर्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ८ गडी बाद १९० धावा (तनुष आपटे ३६, जय गायकवाड २३, दक्क्ष धुहून नाबाद ३१, विक्रांत चोरमले ३-३८, अवधुत धनवडे २-८) वि.वि. स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकः २० षटकात ७ गडी बाद १८२ धावा (ऋषीकेश पुराणीक ६६ (४१, १० चौकार, १ षटकार), सुरज शिंदे ३९, तनुश आपटे २-३३, नील लिमये २-३३); सामनावीरः तनुश आपटे;

राजस्थान रॉयल्स् अ‍ॅकॅडमी पुणेः २० षटकात ५ गडी बाद २२६ धावा (शौर्य पांचाळ ५८ (२८, ३ चौकार, ५ षटकार), अव्देत वानखेडे नाबाद ४५, अर्णव बोम्बे ४२, आर्कष यादव ३०, सर्वेश पाटेकर २-४१) वि.वि. पुणे इन्स्टिट्युट ऑफ क्रिकेटः १४.१ षटकात १० गडी बाद ६८ धावा (हिमांशु यादव १८, चैतन्य धुरी १२, समर्थ काशिद ३-१५, श्वेतांग चर्तुवेदी २-७); सामनावीरः समर्थ काशिद;

आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ८ गडी बाद २०४ धावा (ऋत्विक रडे ८९ (४७, ७ चौकार, ६ षटकार), ज्ञानल ठिगळे ५५ (२८, ९ चौकार), वरद महोरे २१, सिध्दार्थ बोराटे ३-४६, राम यादव २-२२);(भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी ज्ञानल आणि ऋत्विक यांच्यामध्ये ११० (५७) वि.वि. सनराईज क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १९.२ षटकात १० गडी बाद ६४ धावा (शिवम कदम १९, पार्थ गनबावळे ३-१, अनुज पटेल ३-१०, सौशिक जगताप २-११); सामनावीरः ऋत्विक रडे;

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण