कै. रवि कुंभार करंडक’ १४ वर्षाखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धाग्रेसिया क्रिकेट अ‍ॅकॅडमीची विजयाची हॅट्ट्रीक; क्रिडा क्लचर अ‍ॅकॅडमीचा विजयी सलामी !!

पुणे, २५ मेः ग्रेसिया क्रिकेट अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित ‘कै. रवि कुंभार करंडक’ १४ वर्षाखालील आंतरक्लब एकदिवसीय (५०-५० षटकांच्या) क्रिकेट स्पर्धेत यजमान गे्रसिया क्रिकेट अ‍ॅकॅडमी वि जयाची हॅट्ट्रीक नोंदविली. क्रिडा क्लचर अ‍ॅकॅडमीने आपल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.

धायरी येथील डिएसके विश्व स्टार क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात आयुष मोरे याने फटकावलेल्या १२९ धावांच्या जोरावर ग्रेसिया क्रिकेट अ‍ॅकॅडमीने साई एमजे स्पोटर्स अ‍ॅकॅडमीचा ५ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना साई एमजे स्पोटर्स अ‍ॅकॅडमीने २०१ धावांचे आव्हान उभे केले. मनिष जकनाळे याने ५३ धावांची तर, अर्थव मांडवकर याने ३८ धावांची खेळी केली. ग्रेसिया क्रिकेट अ‍ॅकॅडमीने हे आव्हान २४ षटकात पूर्ण केले. आयुष मोरे याने ८२ चेंडूत १६ चौकार आणि ६ षटकारांसह १२९ धावांची खेळी केली. आयुष आणि अर्जुन थोरात (२० धावा) यांनी तिसर्‍या गड्यासाठी यांनी ५६ चेंडूत ११२ धावांची भागिदारी करून संघाचा विजय साकार केला.

वैकटेश ताडवालकर याने केलेल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर क्रिडा क्लचर अ‍ॅकॅडमीने डिलीयंट क्लबचा २२८ धावांनी सहज पराभव केला. क्रिडा क्लचर अ‍ॅकॅडमी संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४०.१ षटकात ३५० धावांचा डोंगर उभा केला. ऋषभ कुलकर्णी (५४ धावा), क्षितीज मोरगांवकर (४७ धावा), शौर्य उडवंत (४३ धावा), वैकटेश ताडवालकर (४२ धावा), नरूप बोरकर (३५ धावा) आणि आरव अम्बुलगेकर (३१ धावा) यांनी संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना डिलीजंट क्रिकेट क्लबचा डाव १२२ धावांवर मर्यादित राहीला. तनिष्क राठोड आणि वैकटेश ताडवालकर या दोघांनी प्रत्येकी तीन गडी बाद करून संघाचा विजय साकार केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
साई एमजे स्पोटर्स अ‍ॅकॅडमीः ४४ षटकात १० गडी बाद २०१ धावा (मनिष जकनाळे ५३ (६१, ८ चौकार), अर्थव मांडवकर ३८, श्रेयस वाघमारे १७, अर्जुन थोरात २-१६, पियुष पाल २-३२) पराभूत वि. ग्रेसिया क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २४ षटकात ५ गडी बाद २०२ धावा (आयुष मोरे १२९ (८२, १६ चौकार, ६ षटकार), अर्जुन थोरात २०, आदित्य घडाशी २-१५);(भागिदारीः तिसर्‍या गड्यासाठी आयुष आणि अर्जुन यांच्यामध्ये ११२ (५६); सामनावीरः आयुष मोरे;

क्रिडा क्लचर अ‍ॅकॅडमीः ४०.१ षटकात १० गडी बाद ३५० धावा (ऋषभ कुलकर्णी ५४ (३१, १३ चौकार), क्षितीज मोरगांवकर ४७, शौर्य उडवंत ४३, वैकटेश ताडवालकर ४२, नरूप बोरकर ३५, आरव अम्बुलगेकर ३१, स्वराज पवार ४-७५, इलियान त्यागी ३-५४) वि.वि. डिलीजंट क्रिकेट क्लबः ३० षटकात १० गडी बाद १२२ धावा (साईराज थोरात २६, तनिष्क राठोड ३-९, वैकटेश ताडवालकर ३-१९); सामनावीरः वैकटेश ताडवालकर.

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण