टीपीएल - पीएमडीटीए खुल्या टेनिस स्पर्धेत मंदार वाकणकरला दुहेरी मुकुट पुरुष गटात दक्ष अगरवाल, महिला गटात श्रावणी देशमुख यांना विजेतेपद

पुणे, २४ मे २०२४: मंदार वाकणकर टेनिस अकादमी व गोल्ड लिफ यांच्या तर्फे आयोजित व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या टीपीएल - पीएमडीटीए खुल्या टेनिस स्पर्धेत मंदार वाकणकर याने पुरुष दुहेरी व ३५ वर्षांवरील दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, पुरुष गटात दक्ष अगरवाल याने, महिला गटात श्रावणी देशमुख यांनी विजेतेपद पटकावले. 

स.प.महाविद्यालय टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत पुरुष दुहेरीत अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित मंदार वाकणकर व ऋषिकेश पाटस्कला यांनी अव्वल मानांकित अर्जुन अभ्यंकर व अर्णव कोकणे यांचा ६-२ असा पराभव करुन विजेतेपद पटकावले. ३५ वर्षावरील दुहेरीत अंतिम फेरीत मंदार वाकणकर व सुमंत पॉल यांनी मुकुंद जोशी व अजित सैल यांचा ६-२ असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. 

पुरुष एकेरीत अंतिम फेरीच्या लढतीत पाचव्या मानांकित दक्ष अगरवाल याने अव्वल मानांकित अनमोल नागपुरेचा ६-३ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. महिला एकेरीत अंतिम फेरीत श्रावणी देशमुखने रमा शहापूरकरचा ४-०, ४-० असा एकतर्फी पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. 

यावेळी मेक्सिको येथे पार पडलेल्या आयटीएफ मास्टर्स जागतिक टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अजित सैल आणि नितीन किर्तने या भारतीय संघाने सांघिक गटात भारताच्या इतिहासात प्रथमच रजतपदकांची कमाई करणाऱ्या या दोन्ही खेळाडूंचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अपर्णा वाकणकर, मुग्धा वाकणकर आणि मंदार वाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

निकाल: पुरुष एकेरी: उपांत्य फेरी: 
अनमोल नागपुरे(१)वि.वि.रोहन फुले(७)६-३;
दक्ष अगरवाल(५)वि.वि.पार्थ चिवटे(३) ६-२;
अंतिम फेरी: दक्ष अगरवाल(५)वि.वि.अनमोल नागपुरे(१)६-३;

महिला एकेरी: अंतिम फेरी: 
श्रावणी देशमुख वि.वि.रमा शहापूरकर ४-०, ४-०; 

पुरुष दुहेरी: उपांत्य फेरी: 
अर्जुन अभ्यंकर/अर्णव कोकणे(१) वि.वि.अथर्व अगरवाल/रजत परमार(४) ६-१;
मंदार वाकणकर/ऋषिकेश पाटस्कला(२) वि.वि.विवेक खडगे/सुमंत पॉल ६-१;
अंतिम फेरी:मंदार वाकणकर/ऋषिकेश पाटस्कला(२) वि.वि.अर्जुन अभ्यंकर/अर्णव कोकणे(१) ६-२;       ३५ वर्षावरील दुहेरी गट: उपांत्य फेरी: 
मुकुंद जोशी/अजित सैल वि.वि.होझेफा हकीम/रोहन नाईक ६-२;
मंदार वाकणकर/सुमंत पॉल वि.वि.विवेक खडगे/प्रफुल नागवानी ६-१;
अंतिम फेरी: मंदार वाकणकर/सुमंत पॉल वि.वि.मुकुंद जोशी/अजित सैल ६-२.

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण