तिसरी ‘स्पोटर्सफिल्ड करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धाक्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीची विजयाची हॅट्ट्रीक ! सनराईज क्रिकेट स्कूल संघाचा सलग दुसरा विजय !!

पुणे, २४ मेः स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित तिसर्‍या ‘स्पोटर्सफिल्ड करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील २५-२५ षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी संघाने विजयाची हॅट्ट्रीक नोंदविली. सनराईज क्रिकेट स्कूल संघाने सलग दुसरा विजय मिळवत स्पर्धेत आगेकूच केली.

शाहु महाविद्यालय येथील सनराईज क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत आराध्य देवोरे याने केलेल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर सनराईज क्रिकेट स्कूलने स्पार्क अ‍ॅकॅडमीचा ४५ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना सनराईज क्रिकेट स्कूलने १५६ धावा धावफलकावर लावल्या. उत्कर्ष भोसले (१६ धावा), आराध्य देवोरे (१६ धावा) यांनी संघाचा डाव सावरला. या लक्ष्याचा पाठलाग करताना स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १०९ धावांवर मर्यादित राहीला. आराध्य देवोरे याने ८ धावात २ गडी टिपले तर, इशान भोईटे याने २७ धावात २ गडी बाद करून संघाचा विजय साकार केला.

रिवान रांगणेकर याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने २२ याडर्स संघाचा ३९ धावांनी पराभव करून विजयाची हॅट्ट्रीक नोंदविली. पहिल्यांदा फलंदाजी करताना क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने १६२ धावांचे आव्हान उभे केले. अव्देत अमोंडकर (३८ धावा), इलियान त्यागी (२६ धावा) आणि विवान देशमुख (२० धावा) यांनी संघाचा डाव सावरला. या आव्हानाचा पाठलाग करताना २२ याडर्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १२३ धावांवर मर्यादित राहीला. कोविड पराशर (नाबाद ५३ धावा) याची खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही. रिवान याने ५ षटके टाकताना ३ षटके बिनधाव टाकत ८ धावांमध्ये एक गडी बाद केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
सनराईज क्रिकेट स्कूलः २५ षटकात ९ गडी बाद १५६ धावा (उत्कर्ष भोसले १६, आराध्य देवोरे १६, वरद पवार १०, दर्श भगत ३-१८) वि.वि. स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २४.१ षटकात १० गडी बाद १०९ धावा (साई जवळकर १७, अमेय देसाई १६, आराध्य देवोरे २-८, इशान भोईटे २-२७); सामनावीरः आराध्य देवोरे;

क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ७ गडी बाद १६२ धावा (अव्देत अमोंडकर ३८, इलियान त्यागी २६, विवान देशमुख २०, संकल्प सावंत २-२४, अर्जुन फडके २-२८) वि.वि. २२ याडर्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ३ गडी बाद १२३ धावा (कोविड पराशर नाबाद ५३ (६७, ७ चौकार), संकल्प सावंत नाबाद २७, रिवान रांगणेकर १-८); सामनावीरः रिवान रांगणेकर.

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण