युट्यूबर्सच्या क्षेत्रात आव्हाने आहेत; मात्र चिकाटी सातत्य असल्यास यश नक्की

पुणे : कंटेन्ट क्रिएटर-युट्यूबर्सच्या क्षेत्रातही आव्हाने आहेत. मात्र सातत्य, चिकाटी आणि शिकण्याची वृत्ती असल्यास यश-पैसा नक्की मिळू शकतो, असा विश्वास मराठी भाषेतील आघाडीच्या युट्यूबर्सनी व्यक्त केला. 

अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्स, संवाद पुणे आणि हाऊस ऑफ सक्सेसतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे रिसर्च पार्क फाऊंडेशन, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन, भावार्थ यांच्या सहकार्याने बांलगंधर्व कलादालनात आयोजित तीन दिवसीय नेक्स्ट जेन करिअर फेस्ट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रात ‌‘हटके करियर : युट्यूबर्स आणि इन्फ्लुएंसर्सचे‌’ हा संवादात्मक विशेष कार्यक्रम झाला. यात सुकीर्त गुमास्ते, उर्मिला निंबाळकर, मधुरा बाचल यांचा सहभाग होता. त्यांच्याशी भावार्थच्या व्यवस्थापक कीर्ती जोशी यांनी संवाद साधला. तत्पुर्वी ‌‘दहावी व बारावीनंतरचे करियर‌’ या विषयावर सुप्रसिद्ध करियर काऊन्सेलर आणि सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांचे व्याख्यान झाले.
सुकीर्त गुमास्ते, उर्मिला निंबाळकर आणि मधुरा बाचल यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली, कुटुंबियांचा पाठींबा कसा मिळाला, काळानुरूप बदल कसे घडत गेले याविषयी मनमोकळा संवाद साधला. या क्षेत्रात यायचे असेल तर सातत्य, तपश्चर्या आणि नवीन करण्याची उर्मी लागते. या क्षेत्रात पेशन्स खूप महत्त्वाचा असतो. आपआपल्या क्षेत्रात आवडीचे काम करत गेल्यास संधी आपोआप मिळत जातात. आपल्याला काय करायचे आहे हे आधी निश्चित करावे लागते. आपल्या आवडीच्या कामातूनच आपल्याला आनंद घेता येतो. ‌‘मला व्यक्त व्हायचे आहे‌’ असे वाटणे, कुठला विषय मांडायचे हे शोधणे हे खूप महत्त्वाचे असते, असे त्यांनी सांगितले.
या क्षेत्रात आलो तेव्हा आव्हाने खूप होती. बदलत्या तंत्रज्ञानाचा सातत्याने अभ्यास करावा लागला. टेक्नॉलॉजीप्रमाणे स्वत:लाही अपग्रेड करावे लागले. आपल्या कामाविषयी नशा असेल तर धावणे थांबत नाही. युट्यूबर्सच्या क्षेत्रातील कंन्टेंट ‌‘किंग‌’ तर कन्सिटन्सी ‌‘क्विन‌’ आहे.
इतर व्यवसायाप्रमाणे या व्यवसायतही धोके आहेत. या क्षेत्रात येण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. पैसा कधी आणि किती मिळेल हे कुणी नक्की सांगू शकत नाही. एकदा तुमचे गुडविल तयार झाले की तुमच्या वाटा प्रशस्त होतात. आपल्या जगणातूनच आपला ब्रँड तयार होत असतो, असे त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले. मान्यवरांचे स्वागत समिधा कान्हे यांनी केले.




Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण