भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या अभ्यासक्रमांची घोषणा*


पुणे :

भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज(एरंडवणे,पुणे)ने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे. या अभ्यासक्रमांची माहिती भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. उज्वला बेंडाळे यांनी पत्रकाद्वारे दिली.बी.बी.ए. एल.एल.बी.(५ वर्ष) ,बी.ए. एल. एल.बी.(५ वर्ष), एल.एल.बी(३ वर्ष ), एल.एल.एम.(२ वर्ष), तसेच पीएच.डी.(लॉ)साठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. बी.बी.ए. एल.एल.बी(५ वर्ष),बी.ए .एल. एल. बी.(५ वर्ष) या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा दि.२३ जून रोजी आहे,त्यासाठी १४ जून ही नाव नोंदणीची अंतिम मुदत आहे. एल एल बी(३वर्ष ) साठी प्रवेश परीक्षा दि.२३ जून रोजी आहे,नाव नोंदणीची मुदत १२ जून ही आहे.एल.एल.एम.(२ वर्ष) साठी प्रवेश परीक्षा दि.१४ जुलै रोजी आहे ६ जुलै ही नाव नोंदणीची अंतिम मुदत आहे.

या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी एम एच सीईटी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही,भारती अभिमत विद्यापीठाची सीईटी आवश्यक आहे .त्याविषयी 
अधिक माहिती ८०१०९७७०१० या दूरध्वनी क्रमांकावर तसेच www.bvpnlcpune.org या संकेतस्थळावर मिळू शकेल.

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण