अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा संपन्न, येत्या ७ जूनला चित्रपट होणार रिलीज

प्रेम कहाणी सोबतच आदमखोरी दुनियेतील एका भयानक गुन्ह्याचा उलगडा करून देणार या चित्रपटाचं कथानक आहे. चित्रपटाच्या टीझर नंतर नुकताच या चित्रपटातील गाण्याचा संगीत अनावरण सोहळा कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा झाला. येत्या ७ जूनला हा चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटाचे निर्माते श्री.फैरोज अनवर माजगावकर, श्री.हुसैन निराळे, श्री.श्रीकांत सिंह आणि सह निर्माते म्हणून श्री.अनिल वहाने आणि श्री.सुनील यादव हे आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित राव नरसिंगे यांचे आहे.  

‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटातील प्रमुख कलाकार रत्नागिरीचे सुपुत्र फैरोज माजगावकर, हास्यजत्रा फेम अरुण कदम, संजय खापरे, अश्विनी कुलकर्णी, चैताली चव्हाण आणि दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे यांनी हजेरी लावली होती. तसेच या संगीत अनावरण सोहळ्यात अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संगीत दिग्दर्शक ऍलेन के पी, गायिका साक्षी होळकर, महादेव अशोक चाकणकर, राजेश बिडवे,मन या हिंदी सिनेमाचे संगीत दिग्दर्शक संजीव राठोड,सुहास खामकर, कस्टम ऑफिसर थिरू, उद्योगपती दीपक परमार, वर्षा कापडे, अशोक जाधव, निलेश पुण्यार्थी, प्रसिद्ध उद्योगपती मालेगाव ( नाशिक ) विजय सुखलाल चव्हाण अश्या अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

या चित्रपटात वेगवेगळ्या जॉनरची तीन गीते आहेत. ‘जगून घेतो आज’ मनाचा ठाव घेणाऱ्या या गीताला मंगेश बोरगावकर’ याने स्वरसाज दिला आहे. डॉन्ट वरी या स्फूर्तीदायक गीताला गायिका साक्षी होळकरचा आवाज लाभला आहे. तर ‘राऊडी रजनी डान्स’ हे जोशपूर्ण गाणं ऍलेन के पी आणि बंदना दत्ताने गायलं आहे. संजय नवगिरे आणि प्रशांत जामदार यांनी ही गीते लिहिली आहेत. 

गोल्डन स्ट्राईप्स एंटरटेनमेंट एलएलपी, प्रस्तुतकर्ते एम आर जोकर एंटरटेनमेंट एल एल पी सोबत सहयोगी अनिल एन वहाने फिल्म्स प्रोडक्शन्स आणि कियान फिल्म्स & एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेचे श्री.फैरोज अनवर माजगावकर, श्री.अमजद हुसैन निराळे, श्री.श्रीकांत सिंह आणि सह निर्माते म्हणून श्री.अनिल वहाने आणि श्री.सुनील यादव ‘अ व्हॅलेंटाईन्स डे' या चित्रपटाचे निर्माते आहेत तर श्री.रोहित रावसाहेब नरसिंगे यांनी दिग्दर्शित केला आहे त्याच बरोबर पटकथेची देखील जबाबदारी श्री रोहित रावसाहेब नरसिंगे यांनी निभावली. अभिनेता संजय खापरे, अभिनेता सुरेश विश्वकर्मा, अभिनेता अरुण कदम, अभिनेता अभिजित चव्हाण, अभिनेता फैरोज माजगावकर, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार स्टार कास्ट असून अभिनेत्री चैताली विजय चव्हाण पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसेल. साई पियुष,एलेन के पी ऊर्फ सिद्धार्थ पवार आणि निरंजन पेडगावकर हे संगीत दिग्दर्शक आहे.

चित्रपटातील पहिल ‘राऊडी रजनी डान्स’ हे गाण सोशल मीडियावर नुकतच प्रदर्शित झाल आहे तसेच या चित्रपटातील इतर गाण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत आहे. मात्र चित्रपटाच्या कथेत काय रहस्य दडलं आहे? हे पाहाण औत्सुक्याच ठरेल. येत्या ७ जूनला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट पाहायला विसरू नका.

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण