वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी रंगला कर्तुत्ववान महिलांचा 'स्त्री गौरव पुरस्कार 2024' सन्मान सोहळा

पुणे : रॅम्प वॉक, महिलांसाठी रंगलेले विविध गेम्स, खेळ पैठणीचा मध्ये धम्माल मस्ती आणि लकी ड्रॉ च्या माध्यमातून बक्षिसांची लयलूट करत महिलांनी दिवसभर वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा आनंद लुटला. निमित्त होते  जनकल्याण बहुउद्देशीय फौडेशन, पुणेच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त आयोजित  कर्तुत्ववान महिलांना 'स्त्री गौरव पुरस्कार 2024' सन्मान सोहळ्याचे. 

अण्णाभाऊ साठे सभागृह सातारा रोड, पुणे येथे हा सन्मान सोहळा दुपारी 12 ते रात्री 8 या दरम्यान पार पडला.यावेळी सिने अभिनेत्री मेघना झुझम,अभिनेत्री आरती शिंदे, अभिनेता सिध्देश्वर झाडबुके, अभिनेता महेश सोनवणे,अभिनेत्री राधिका पिसाळ,कविता गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई,फौडेशनचे उपाध्यक्ष आणि अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, शितल पाटील, सचिन पाटील, शोभा पाटील आणि जनकल्याण बहुउद्देशीय फौडेशनचे अध्यक्ष, माजी पोलिस उपायुक्त, अभिनेते, निर्माते आणि अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे लीगल सल्लागार शहाजीराव एस. पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. 

जनकल्याण बहुउद्देशीय फौडेशन, पुणेच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त  कर्तुत्ववान महिलांना 'स्त्री गौरव पुरस्कार 2024' देवून सन्मानित करण्यात आले. यामध्ये निवेदिका, लेखिका रुतुजा फुलकर, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक अश्विनी कामठे, तृतीयपंथी समाजसेविका कादंबरी शेख (टी.जी), गायिका प्रतिभा थोरात, समाजसेविका सुनीता मोडक, ह. भ. प. अर्चनादीदी साळूंखे (सगर) , प्राणी मित्र रंजना घाटपांडे, आरोग्यसेविका अंजु काझी,फॅशन डिझायनर सुमय्या पठाण आदींना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण