डीवाय पाटील इन्स्टिट्यूट पुरस्कृत 19व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत तविश पाहवा, पार्थसारथी मुंढे यांना दुहेरी मुकुटाची संधी

कोल्हापूर, 25 मे 2024: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित व डीवाय पाटील इन्स्टिट्यूट पुरस्कृत 19व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मूळच्या गटात हरियाणाच्या तविश पाहवा याने तर, मुलींच्या गटात पार्थसारथी मुंढे यांनी दुहेरी गटातील विजेतेपदाबरोबरच एकेरीत अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे. 

कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या दहाव्या मानांकित पार्थसारथी मुंढेने सहाव्या मानांकित हरियाणाच्या स्वस्ति सिंगचा 6-3, 6-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. पहिल्या सेटमध्ये पार्थसारथीने तिसऱ्या गेममध्ये स्वस्तिची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये पार्थसारथीने स्वस्तिला फारशी संधी दिली नाही. या सेटमध्ये तिसऱ्या, पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-0 असा जिंकून विजय मिळवला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत पंजाबच्या तिसऱ्या मानांकित रांझना संग्रामने महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत स्वानिका रॉयचा 6-1, 6-0 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. 

मुलांच्या गटात दहाव्या मानांकित हरियाणाच्या तविश पाहवाने महाराष्ट्राच्या शिवतेज शिरफुलेचे आव्हान 6-0, 6-2 असे संपुष्टात आणले. दुसऱ्या लढतीत हरियाणाच्या अव्वल मानांकित प्रतीक शेरॉनने तेलंगणाच्या तिसऱ्या मानांकित हृतिक कटकमचा 5-7, 5-2 सामना सोडून दिला. दुसऱ्या सेटमध्ये हृतिकला दुखापत झाल्यामुळे त्याने या स्पर्धेतून माघार घेतली. 

निकाल: मुख्य ड्रॉ: मुले: उपांत्य फेरी:
प्रतीक शेरॉन(हरियाणा)(1)वि.वि.हृतिक कटकम(तेलंगणा)(3)5-7, 5-2 सामना सोडून दिला.  
तविश पाहवा(हरियाणा) (10)वि.वि.शिवतेज शिरफुले(महा) 6-0, 6-2;

मुली:  
पार्थसारथी मुंढे(महा)(10)वि.वि.स्वस्ति सिंग(हरियाणा)(6) 6-3, 6-0; 
रांझना संग्राम(पंजाब)(3)वि.वि.स्वानिका रॉय (महा) 6-1, 6-0.

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण