डीवाय पाटील इन्स्टिट्यूट पुरस्कृत 19व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत शिवतेज शिरफुले, तविश पाहवा, पार्थसारथी मुंढे, स्वानिका रॉय यांचा उपांत्य फेरीत प्रवेशदुहेरीत पार्थसारथी मुंढे व आकांशा घोष, हृतिक कटकम व तविश पाहवा यांना विजेतेपद

कोल्हापूर, 24 मे 2024: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित व डीवाय पाटील इन्स्टिट्यूट पुरस्कृत 19व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत शिवतेज शिरफुले, तविश पाहवा यांनी तर, मुलींच्या गटात पार्थसारथी मुंढे, स्वानिका रॉय यांनी मानांकित खेळाडूंवर विजय उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुहेरीत मुलींच्या गटात पार्थसारथी मुंढे व आकांशा घोष यांनी तर, मुलांच्या गटात हृतिक कटकम व तविश पाहवा यांनी विजेतेपद संपादन केले.

कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत स्वानिका रॉय हिने हरियाणाच्या दुसऱ्या मानांकित आनंदिता उपाध्यायचा 6-3, 6-4 असा पराभव करून आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम राखली. महाराष्ट्राच्या दहाव्या मानांकित पार्थसारथी मुंढेने गुजरातच्या चौथ्या मानांकित शैवी दलालचा 6-2, 6-2 असा पराभव केला. सहाव्या मानांकित हरियाणाच्या स्वस्ति सिंगने तामिळनाडूच्या दीपशिका विनयगमूर्तीचा 6-2, 6-4 असा तर, पंजाबच्या तिसऱ्या मानांकित रांझना संग्रामने महाराष्ट्राच्या पाचव्या मानांकित नैनिका बेंद्रमचा 6-2, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

मुलांच्या गटात अव्वल मानांकित हरियाणाच्या प्रतीक शेरॉनने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत महाराष्ट्राच्या नील केळकरचा 6-1, 6-3 असा पराभव केला. संघर्षपूर्ण लढतीत महाराष्ट्राच्या शिवतेज शिरफुलेने कर्नाटकाच्या पाचव्या मानांकित प्रकाश सरणचा टायब्रेकमध्ये 7-6(5), (5)6-7, 6-4 असा पराभव करून आणखी सनसनाटी निकालाची नोंद केली. तेलंगणाच्या तिसऱ्या मानांकित हृतिक कटकमने महाराष्ट्राच्या सक्षम भन्साळीचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. दहाव्या मानांकित हरियाणाच्या तविश पाहवाने आपला राज्य सहकारी चौथ्या मानांकित हर्ष मलिकचा 6-0, 6-1 असा सहज पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.

 दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित तेलंगणाच्या हृतिक कटकम व हरियाणाच्या तविश पाहवा यांनी महाराष्ट्राच्या मनन अगरवाल व कर्नाटकच्या प्रकाश सरन यांचा 3-6, 6-0, 10-6 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या पार्थसारथी मुंढे व पश्चिम बंगालच्या आकांशा घोषया तिसऱ्या मानांकित जोडीने अव्वल मानांकित हरियाणाच्या आनंदिता उपाध्याय व पंजाबच्या रांझना संग्राम यांचा 4-6,स्पर्धेचे पारितोषिक वितरण केडीएलटीएचे चेअरमन दिलीप मोहिते, स्पर्धा संचालक व एमएसएलटीएचे सहसचिव शितल भोसले, केडीएलटीएचे सचिव मेघन बागवडे, केडीएलटीए आजीव सदस्य आशिष शहा, आनंद शहा आणि आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर यांच्या हस्ते करण्यात आले.   

निकाल: मुख्य ड्रॉ: मुले: उपांत्यपूर्व फेरी:
प्रतीक शेरॉन(हरियाणा)(1)वि.वि.नील केळकर(महा) 6-1, 6-3;
हृतिक कटकम(तेलंगणा)(3)वि.वि.सक्षम भन्साळी (महा) 6-3, 6-2;
तविश पाहवा(हरियाणा) (10)वि.वि.हर्ष मलिक(हरियाणा)(4) 6-0, 6-1;  
शिवतेज शिरफुले(महा)वि.वि.प्रकाश सरण(कर्नाटक)(5) 7-6(5), (5)6-7, 6-4;

मुली:  
स्वस्ति सिंग(हरियाणा)(6)वि.वि.दीपशिका विनयगमूर्ती (तामिळनाडू) 6-2, 6-4;
पार्थसारथी मुंढे(महा)(10)वि.वि.शैवी दलाल(गुजरात)(4) 6-2, 6-2;
रांझना संग्राम(पंजाब)(3)वि.वि.नैनिका बेंद्रम(महा)(5) 6-2, 6-3;    
स्वानिका रॉय (महा)वि.वि.आनंदिता उपाध्याय(हरियाणा)(2)6-3, 6-4;  

दुहेरी गट: मुली: उपांत्य फेरी:
आनंदिता उपाध्याय(हरियाणा)/रांझना संग्राम(पंजाब)(1)वि.वि.स्वस्ती सिंग(हरियाणा)/एंजल पटेल(गुजरात) 6-1, 6-1;  
पार्थसारथी मुंढे(महा)/आकांशा घोष(पश्चिम बंगाल)(3)वि.वि.शैवी दलाल(गुजरात)/मेघना जीडी(कर्नाटक)(2) 4-6, 7-5, 10-6;
अंतिम फेरी: पार्थसारथी मुंढे(महा)/आकांशा घोष(पश्चिम बंगाल)(3)वि.वि.आनंदिता उपाध्याय(हरियाणा)/रांझना संग्राम(पंजाब)(1)4-6, 7-5, 11-9;

मुले: उपांत्य फेरी:
मनन अगरवाल(महा)/प्रकाश सरन(कर्नाटक)(3) वि.वि.शरण सोमासी(कर्नाटक)/चन्नामालिकाअर्जुन याले(कर्नाटक)7-6(4), 6-3;  
हृतिक कटकम(तेलंगणा)/तविश पाहवा(हरियाणा)(2) वि.वि.आराध्य म्हसदे(महा)/ऋषी यादव(उत्तरप्रदेश)(४)6-0, 7-5;
अंतिम फेरी: हृतिक कटकम(तेलंगणा)/तविश पाहवा(हरियाणा)(2) वि.वि.मनन अगरवाल(महा)/प्रकाश सरन(कर्नाटक)(3)3-6, 6-0, 10-6. 7-5, 11-9 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकाव

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण