बी अ स्पोर्ट क्रिकेट अकादमी करंडक 14वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत शहरातून 8संघ सहभागी

पुणे, 25 मे 2024: बी अ स्पोर्ट क्रिकेट अकादमी यांच्या वतीने आयोजित बी अ स्पोर्ट क्रिकेट अकादमी करंडक14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत शहरातून 8 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा चिखली येथील सिल्व्हर स्पोर्टस क्रिकेट मैदानावर 27 मे 2024 पासून सुरू होणार आहे. 

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धा संचालक उत्कर्ष अग्रवाल यांनी सांगितले की, या स्पर्धेच्या माध्यमातून 14 वर्षांखालील गटातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

स्पर्धेत फ्रेंड्स क्रिकेट अकादमी, वेदिक फिटनेस अँड स्पोर्टस अकादमी, एसएनबीपी ऑल स्टार्स, क्रिकबेसिक्स क्रिकेट अकादमी, दिलीजेंट क्रिकेट अकादमी, बीअ स्पोर्ट क्रिकेट अकादमी अ, बीअ स्पोर्ट क्रिकेट अकादमी ब, बीअ स्पोर्ट क्रिकेट अकादमी क हे 8 संघ झुंजनार आहेत.

तसेच, ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेचे सामने 30षटकांचे होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या संघाला करंडक, पदक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, सामनावीर यांना प्रत्येकी 1000 रुपये व करंडकअशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे अग्रवाल यांनी नमूद केले

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण