वारजे येथील स्मृतीवन टेकडीवर २१८ स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी केली ५६५ देशी झाडांची लागवड* भांबुर्डा रेंज, वन विभाग, महा एनजीओ फेडेरेशन, सस्टेनाबिलीटी इनिशीएटीवज, व्हीके ग्रुप व लायन्स क्लब तर्फे आयोजन
*वारजे येथील स्मृतीवन टेकडीवर २१८ स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी केली ५६५ देशी झाडांची लागवड*
भांबुर्डा रेंज, वन विभाग, महा एनजीओ फेडेरेशन, सस्टेनाबिलीटी इनिशीएटीवज, व्हीके ग्रुप व लायन्स क्लब तर्फे आयोजन
पुणे : वन विभागाच्या वारजे येथील स्मृतीवन टेकडीवर २१८ स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी ५६५ देशी झाडांची लागवड केली. भांबुर्डा रेंज, वन विभाग, महा एनजीओ फेडरेशन, सस्टेनाबिलीटी इनिशीएटीवज, व्हीके ग्रुप व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षरोपण कार्यक्रम स्मृतीवन टेकडीवर संपन्न झाले.
वृक्षारोपण कार्यक्रमात देशी झाडांचा समावेश करण्यात आला. त्यात चिंच, पळस, भावा, अर्जुन, कांचन, पुतरंजीव, रोहितक, एन, पिंपळ, मोह, रिठा इ.अश्या देशी वृक्षांचा समावेश होता. ह्या वृक्षारोपणा मध्ये मतिमंद, लहान मुले अनाथ, वयोवृद्ध, युवक, व्याधीग्रस्थ, आदिवासी अश्या समाजातील विविध घटकातील स्वयंसेवकांना समाविष्ट करून एक पर्यावरणीय उपक्रमात सामाजिक बांधिलकी जोपासली गेली आहे. ह्या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन अमोल उंबरजे, मुकुंद शिंदे आणि किशोर मोहोळकर यांनी केले. संपूर्ण वृक्षाची देखभाल लायन्स क्लब यांच्या माध्यमातून किशोर मोहोळकर हे करणार आहेत.
सस्टेनाबिलीटी इनिशीएटीवज व महा एनजीओ फेडरेशन ह्या संस्था नेहमी अश्या प्रकारचे वृक्षरोपण कार्यक्रम राबवित असतात. यावेळी अमोल उंबरजे, मुकुंद शिंदे, किशोर मोहोळकर, रघुनाथ ढोले पाटील, विजय सारडा, श्रयांश दीक्षित, कन्या दीक्षित, संगीता कानसे, महेश गव्हाणे, अर्चना गव्हाणे, वीरेंद्र बोराडे, रामेश्वर फुंडीपल्ले, गंधीले सर वन विभाग, अनघा आठवले, विशाल देशमुख, कांचन सिधये, आकांशा केंभावी, गिरीश काळे, केतकी करमरकर, अपूर्वा कारवा, आशुतोष जोशी, कोमल गांधी इतर मान्यवर उपस्थित होते.
व्हीके ग्रुप, जिनसपोर्ट, लायन्स क्लब, रिझिलीयंट, जिनओंबिओ, ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर, पुणे डेक्कन इंडिया चॅप्टर, स्टडकॉम, नवक्षितिज मतिमंद मुलांची संस्था,एफएसएआय, युनिक इनवारोकेअर, अप्रोच हेलपिंग हॅन्ड्स, ममता फौंडेशन, इशरे पुणे चॅप्टर, मराठवाडा मित्र मंडळ ह्या संस्थाचे प्रतिनिधी हि वृक्षारोपण मध्ये सहभागी झाले होते. महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक आणि महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांची नेहमीच अश्या प्रकल्पांना पाठिंबा असतो.
कार्यक्रमानंतर वृक्षलागवड का महत्वाची आहे व लागवडीनंतर काय काळजी घ्यावी लागते यावर किशोर मोहळकर यांचे मार्गदर्शन झाले. अमोल उंबरजे यांनी अश्याच प्रकारे सर्व संस्था एकत्र येऊन वृक्षलागवड करून त्याची काळजी घ्यायला हवी व पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करण्याचे आवाहन केले.
Comments
Post a Comment