सॅम बहादूर’ चित्रपट राष्ट्रीय नेत्यांच्या विकृतीकरणाचा निंद्य प्रयत्न.. तिव्र निषेध.. चित्रपटावर बंदी’ची मागणी… काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे दि १९ -
निर्माता - दिग्दर्शक रॅानी स्क्रुवाला व मेधना गुजराल यांनी प्रदर्शीत केलेला “सॅम बहादुर” हा हिंदी चित्रपट भारताच्या माजी पंतप्रधान, बँकांचे राष्ट्रीयकरण व पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या देशाच्या कणखर नेत्या, श्रीमती इंदीराजी गांघी यांचे चारीत्र्य हनन करण्याचा निंदनीय प्रयत्न आहे.
सदर चित्रपटात, श्रीमती इंदीराजींच्या निर्णय क्षमते विषयी व चारित्र्या विषयी शंका ऊपस्थित करणारे, गैरसमज वाढवणारे अवास्तव व अनावश्यक प्रसंग दाखवले आहेत.
सदरच्या कथित व अवास्तवदर्शी चित्रपटातुन ‘स्वातंत्र्योत्तर भारत’ ऊभारणाऱ्या काँग्रेस नेत्यां विषयी, पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयश्री विषयी, तथ्यहीन प्रसंग दर्शवुन, जाणीव पुर्वक गैरसमज दाखवल्याचे आढळून येते.
वास्तवतेला तिलांजली देत व असत्याचा आधार घेत, काल्पनिक चरीत्रे निर्माण करून नेहरू_गांधी कुटुंबियां प्रती, द्वेषाने पछाडलेल्या हिन मानसिकतेचे दर्शन ‘सॅम बहादुर’ चित्रपटातुन होते आहे.
पहीले पंतप्रधान पंडीत नेहरू व श्रीमती इंदीराजी गांधी यांना सतत कमकुवत, निर्णय क्षमताहिन व चारित्र्यहिन दाखवण्याचा केलेला प्रयत्न, निंदनीय असुन काँग्रेसच्या आकसा पोटीच्, राजकीय महाशक्तींच्या पाठबळावर या चित्रपटाची निर्मिती झाली असल्याचा आरोप ही काँग्रेस ने केला.
याचा तिव्र निषेध व्यक्त करीत जनतेने अशा चित्रपटावर बहीष्कार टाकावा तसेच यावर बंदी आणण्याची मागणी देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी या
Comments
Post a Comment