अत्यंत दुर्गम भागातील आदिवासी कातकरी समाजातील १०० हुन अधिक कुटुंबियांना दिवाळी फराळ वाटप.

हवेली तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील आदिवासी कातकरी समाजातील १०० हुन अधिक कुटुंबियांना केअर टेकर्स सोसायटी च्या वतीने लेफ्टनंट कर्नल रवि चौधरी यांचा हस्ते व कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दिवाळी फराळ किट वाटप करण्यात आले. पानशेत येथील थोपटेवाडी,वरदाडे, मालखेड, सोनापूर, आंबी या गावातील आदिवासी,कातकरी,महादेव कोळी आणि मागासवर्गीय समाजातील एकूण 100 हून अधिक कुटुंबियांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आले व भाऊबीज रुपी सर्व आदिवासी कुटुंबातील महिलांना व दुर्गम भागातील महिलांना साडी भेट करण्यात आली.आदिवासी व कातकरी बांधव हे अत्यंत खडतर कष्टाचे जीवन जगत असून ते फक्त आदिवासी असल्यामुळें. त्यांना कोणतेही शासकीय सुविधा मिळत नाही अस्या लोकांपर्यंत पोचून केअर टेकर्स सोसायटी तर्फे सर्वांची दिवाळी गॉड करण्याचा आली. 
एन दिवाळी सणाच्या निमित्ताने या केअर टेकर्स सोसायटीच्या लोकांनी आमचा विचार केला व एवढे लाम येऊन आमची दिवाळी गॉड केली, डोळ्यांच्या अश्रुने त्या महिलांनी आनंद व्यक्त केला. 
या आदिवासी लोकांची परिस्थिती पाहून केअर टेकर्स सोसायटीच्या युवा कार्यकर्ते मोक्षदा चौधरी, श्रुती बेलिटकर, आराध्या चौधरी आदिवासी, आणि कातकरी मुलांना महिन्यातून दोनदा येऊन आपल्या पायावर उभे राहण्यासाठी अनेक प्रकाच्या कला, शिक्षण, प्रशिक्षण शिबीर घेण्याचे अस्वशान देण्यात आले. या प्रसंगी माजी नगरसेवक अण्णा दांगट, नितीन दादा वाघ, सामाजिक कार्यकर्ते रणजित परदेशी, विजय बेलिटकर हसमुख धवल, संतोष भाऊ शेलार, विष्णूजी दोशी उपस्थित होते. जिनलताई शहा,वर्षाताई शिंदे, राखी ताई जावळे,शितलताई मित्रा, ममता ताई ब्राम्हणे आणि श्रीमती कल्पना ताई मुळगावकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी रित्या पार पाडले.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी