महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा अधिक सक्षम करा; नागरिक सोशल फाउंडेशनची राज्य सरकारकडे मागणी
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा अधिक सक्षम करा; नागरिक सोशल फाउंडेशनची राज्य सरकारकडे मागणी -विलंबासाठी दररोज २५० रुपयांचा दंड, २१ दिवसांत सेवा देण्याची मर्यादा आणि नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव पुणे : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अधिक सक्षम, प्रभावी आणि नागरिकाभिमुख करण्याची मागणी नागरिक सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. शासकीय सेवा वेळेत न मिळणे, ‘आपले सरकार’ पोर्टलवरील तांत्रिक अडचणी, प्रलंबित अर्ज आणि अधिकाऱ्यांवरील मर्यादित कारवाई यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे संस्थेने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यासाठी विविध मागण्या आणि शिफारशी महाराष्ट्र तसेच केंद्र शासनाकडे सादर करण्यात आल्या आहेत. अशी माहिती नागरिक सोशल फाऊंडेशनचे ॲड. सीए निलेश खत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नागरिक सोशल फाऊंडेशनचे विश्वस्त अमेय सप्रे, प्रीतम थोरवे, सर्वेश मेहेंदळे आदि उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना निर्धारित कालमर्यादेत शासकीय सेवा मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र, कायदा ल...